ICICI Bank सह 3 बँकांकडून नवी सेवा सुरू; मोबाईल नंबरवरून दररोज पाठवा 1 लाख रुपये

 

नवी दिल्ली : कोरोना काळात संक्रमण टाळण्यासाठी लोकांनी रोख व्यवहार मोठ्या प्रमाणात टाळलेत. लोकांनी डिजिटल व्यवहारांना अधिक प्राधान्य दिलेय. विशेष म्हणजे यात बऱ्याच समस्याही उद्भवल्या. जेव्हा लोकांना त्यांच्या कुटुंबातील किंवा मित्र-नातेवाईकांकडे एकरकमी पैसे मोठ्या प्रमाणात काढावे लागले. बरीच डिजिटल पेमेंट अ‍ॅप्स त्यांच्या वापरकर्त्यांना दिवसामध्ये एका विशिष्ट मर्यादेपर्यंत रोख रक्कम हस्तांतरित करण्याची परवानगी देतात. जर तुम्हालाही अशा समस्येचा सामना करावा लागला असेल, तर आता तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. आता आपण फक्त मोबाईल नंबरद्वारे आपल्या मित्र, नातेवाईक आणि कुटुंबातील सदस्यांना 1 लाख रुपयांपर्यंत पाठवू शकता.

एअरटेल पेमेंट्स बँकेने पे टू कॉन्टॅक्ट

आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक आणि एअरटेल पेमेंट्स बँकेने पे टू कॉन्टॅक्ट किंवा पे कॉन्टॅक्ट सर्व्हिस सेवा सुरू केलीय. या नवीन सेवेंतर्गत आपण आपल्या मोबाईल नंबरद्वारे मित्राला किंवा कोणत्याही नातेवाईकाला त्यांच्या मोबाईल नंबरवर पैसे पाठविण्यास सक्षम असाल. आतापर्यंत यूपीआयमार्फत पैसे पाठविण्यासाठी इतरांच्या बँक खात्याचा तपशील किंवा यूपीआय आयडी आवश्यक होते. एकदा ही सेवा सुरू झाल्यानंतर यापुढे याची आवश्यकता नाही.पैसे कसे पाठवायचे

>> सर्व प्रथम आपल्या बँकेचे अ‍ॅप उघडा. त्यानंतर पे टू कॉन्टॅक्टवर क्लिक करा किंवा आपला संपर्क क्रमांक द्या.
>> मोबाईल फोनबुक उघडा. त्यानंतर आपणास कोणाला पैसे पाठवायचे ते निवडा.
>> हे करताच बँकेच्या अ‍ॅपवर आपोआपच संपर्काचा यूपीआय पत्ता मिळेल. यासाठी यूपीआय पत्ता देखील असावा.
>> आता रक्कम आणि पासवर्ड प्रविष्ट करा. यानंतर हे पैसे दुसर्‍याच्या खात्यात जातील.
>> बँकांच्या म्हणण्यानुसार, यूपीआयच्या नव्या सेवेसह पेमेंट करताना यूपीआय आयडी किंवा बँकेचा तपशील आवश्यक नाही.
>> नवीन सेवेच्या माध्यमातून कोटक महिंद्रा बँक आपल्या ग्राहकांना 50 हजार रुपयांपर्यंत हस्तांतरण करण्यास परवानगी देईल.
>> आयसीआयसीआय बँकेचे ग्राहक दररोज 1 लाख रुपयांपर्यंत पैसे हस्तांतरित करू शकतात.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area