मॉर्निंग वॉकहून परतलीच नाही, वसईतील बीचवर नवविवाहितेचा मृतदेह आढळला

 

वसई : मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या नवविवाहितेचा मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वसईच्या किल्ला बंदर समुद्र किनाऱ्यावर 30 वर्षांच्या महिलेचा मृतदेह सापडला. महिलेची हत्या झाली, तिने आत्महत्या केली, की अपघात झाला, याचा आता पोलीस तपास करत आहेत. मात्र या घटनेमुळे महिलेच्या कुटुंबीयांसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

अवघ्या दोन महिन्यांपूर्वी विवाह

ममता पटेल असे मृतदेह मिळालेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. ती वसईच्या एव्हरशाईन परिसरातील राहत होती. ती मूळ गुजरातमधील नवसारी येथील रहिवासी होती. अवघ्या दोन महिन्यांपूर्वी तिचा विवाह झाला होता. ममता पटेल गेल्या बुधवारपासून बेपत्ता होती.

मॉर्निंग वॉकला गेल्यापासून बेपत्ता

बुधवार सकाळी सहा वाजता ममता मॉर्निंग वॉक करण्यासाठी घराबाहेर पडली होती. मात्र त्यानंतर ती बेपत्ता झाली होती. याबाबत तुलिंज पोलीस ठाण्यात ती बेपत्ता असल्याची तक्रारही दाखल करण्यात आली होती. मात्र चार दिवसांनंतर तिचा मृतदेह वसईच्या किल्ला बंदर समुद्र किनाऱ्यावर सापडल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. ममताची हत्या झाली, तिने आत्महत्या केली, की अपघात झाला, याचा आता पोलीस तपास करत आहेत.

लग्नानंतर पहिल्यांदा माहेरी, तरुणीची प्रियकरासह आत्महत्या

दरम्यान, नऊ दिवसांपूर्वीच लग्न झालेल्या तरुणीने माहेरी येऊन प्रियकरासोबत आत्महत्या केल्याची घटना गेल्याच महिन्यात समोर आली होीत. सासरहून पहिल्यांदा माहेरी आली असताना 19 वर्षांची विवाहिता आधी बॉयफ्रेण्डला भेटली. त्यानंतर दोघांनी गावाबाहेरील पाण्याच्या टाकीत उडी घेऊन आयुष्य संपवलं. पंजाबमधील मुक्तसर साहिबमधील किल्लियावाली गावात ही घटना घडली होती.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area