कोल्हापूर : जिल्ह्यात रविवारी रात्रीपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. आज दिवसभरही पावसाची संततधार कायम राहिली. त्यामुळे कसबा बावडा (Kasba Bavda) येथील राजाराम बंधारा (rajaram dam)आज चौथ्यांदा पाण्याखाली गेला.गगनबावडा तालुक्यात तब्बल २०५ मिमी. पावसाची नोंद झाली आहे. तर सर्वात कमी ३.९ मिमी. पाऊस हातकणंगले तालुक्यात झाला आहे.
हवामान विभागाने मंगळवार व बुधवारी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.पंधरा दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली आहे. पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.
कसबा बावडा येथील राजाराम बंधारा दुपारी पुन्हा एकदा पाण्याखाली गेला आहे. राजाराम बंधाऱ्याजवळ (dam) पंचगंगा नदीची पातळी १९ फुटांपर्यंत होती.
शहरातील परीख पुलाखाली दुपारी झालेल्या जोरदार पावसाने वाहतुकीला अडथळा येईल एवढे पाणी वाहत होते. तर सासने मैदान रस्ता, दुधाळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत राहिले.