पंकजा मुंडेंना मोठा दणका

 

भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना मोठा झटका बसला आहे. पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे बँक खाते (bank account) सील करण्यात आले आहे.

पीएफची रक्कम थकल्यामुळे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) वतीने वैद्यनाथ कारखान्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. पंकजा मुंडे या कारखान्याच्या अध्यक्षा आहेत.

पीएफचे एक कोटी 46 लाख रुपये थकल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. ईपीएफओच्या औरंगाबाद विभागीय कार्यालयाने पांगरी (ता. पर‌ळी) येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे बँक खाते जप्त केले.

तब्बल 92 लाख रुपयांची थकबाकी वसूल करण्यात आली आहे. सहायक आयुक्त आदित्य तलवारे यांच्या आदेशाने प्रवर्तन अधिकारी सुधीर वानखेडे यांनी ही कारवाई केल्याची माहिती आहे.

वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याकडे मार्च 2018 ते ऑगस्ट 2019 या काळातील कर्मचारी आणि कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीची एकूण 1.46 कोटींची रक्कम  थकीत होती. उर्वरित 56 लाख रुपयांच्या वसुलीसाठी कार्यवाही सुरु असल्याचे ईपीएफओ कार्यालयाने सांगितले आहे. सर्व थकबाकीदारांनी थकीत भविष्य निधी देयकांचा त्वरित भरणा करण्याचे आवाहन विभागीय आयुक्त जगदीश तांबे यांनी केले आहे.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area