मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी; कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले नागरिक निर्बंधांतून सुटणार?

 


मुंबई: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर मुंबईत लागू झालेले निर्बंध अद्याप कायम आहेत. कोरोनाची दुसरी लाट (Coroanvirus) नियंत्रणात येऊनही हे निर्बंध शिथील करण्यात आले नव्हते. त्यामुळे आता मुंबईकर हे निर्बंध कधी उठणार, असा सवाल विचारू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेकडून लवकरच महत्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. येत्या 15 तारखेला यासंदर्भात बैठक होणार आहे. तेव्हा मुंबईकरांना निर्बंधामधून सूट देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होऊ शकते. (Coronavirus situation in Mumbai)

त्यामुळे कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना निर्बंधांतून सूट मिळू शकते. अशा नागरिकांना कार्यालये व इतर ठिकाणी प्रवेशासाठी सवलत देण्याचा विचार सुरु आहे. मुंबईतील कोरोना परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. मात्र, तिसऱ्या लाटेच्या भीतीमुळे राज्य सरकार कोणताही धोका पत्कारायला तयार नाही. त्यामुळे लोकल ट्रेन आणि इतर सेवांवर निर्बंध आहेत. मात्र, दीर्घकाळ निर्बंध लागू असल्याने नागरिकांचा संयम सुटू लागला आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारकडून निर्बंध काहीप्रमाणात शिथील करून नागरिकांना दिलासा दिला जाऊ शकतो.

आतापर्यंत 12 लाख मुंबईकरांना कोरोना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. तर 46,81,780 जणांना कोरोना लसीचा एकच डोस मिळाला आहे. एकूण 59 लाख 29 हजार नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला आहे.

मुंबईचं निर्जंतुकीकरण करण्याच्या मोहिमेत महापालिकेला डोमेक्सची मदत

डोमेक्सने देणगी आणि निर्जंतुकीकरण मोहीमेच्या माध्यमातून दिलेल्या पाठिंब्यामुळे मुंबई महानगरपालिकेला सर्व सार्वजनिक ठिकाणी निर्जंतुकीकरण प्रदान करण्यात आणि स्वच्छतेचे पालन करण्यात मोठी मदत मिळत आहे. फेब्रुवारी महिन्यात जेव्हा मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी लोकल जवळपास दहा महिन्यांनंतर सुरु करण्यात आली तेव्हा डोमेक्सने रेल्वेला आधार देत सीएसटी, ठाणे, दादर, बोरिवली, अंधेरी या गर्दीच्या स्थानकांवर निर्जंतुकीकरण केले. प्लॅटफॉर्म, तिकिट काऊंटर आणि इतर महत्वाच्या ठिकाणी नियमितपणे निर्जंतुकीकरण करण्यासाठी सहा सफाई तज्ज्ञांची टीम तैनात करण्यात आली होती.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area