Tokyo Olympics 2020: टोकियोत महाकाय बाहुलीचा शो, 2011 च्या भुकंपाशी संबंध, फोटो पाहा…

 


जपान 23 : जुलपासून सुरू होणाऱ्या टोकियो ओलिंपिक 2020 साठी सज्ज आहे. या स्पर्धेच्या आयोजनात जपान आपल्या सांस्कृतिक ठेव्याचा आणि चढउतारांच्या आठवणींनाही उजाळा देत आहे. त्याचाच भाग म्हणून टोकियोत निप्पॉन महोत्सवाचं आयोजन करण्यात येतंय. इथं शनिवारी एका महाकाय बाहुलीचा शो सादर केला जाईल. (Photo: PTI/AFP)


टोकियोच्या एका पार्कमधील सांस्कृतिक महोत्सवात 10 मीटर उंचीची बाहुली सादर केली जाईल. 'मोक्को' नावाची ही रंगीबेरंगी बाहुली मोठ्या क्रेनच्या मदतीने पार्कमध्ये आणण्यात आलीय.
ही बाहुली जपानच्या तोहोकु प्रांतातून आलीय. या भागात 2011 मध्ये भूकंप आणि त्सुनामी आल्यानं मोठं नुकसान झालं होतं. त्यानंतर तेथील मुलांनी ही बाहुली बनवलीय. ही बाहुली ‘रिडिस्कवर तोहोकु - मोक्कोज जर्नी फ्रोम तोहोकु टू टोकियो’ या कार्यक्रमात सादर केली जाईल. (Photo: PTI/AFP)मोक्कोचं पहिलं सादरीकरण 15 मे रोजी इवाटे प्रांतात झालं. त्यानंतर तोहोकू क्षेत्रात 3 प्रांतांमध्ये या बाहुलीचा दौरा झाला. या दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात ही बाहुली टोकियोत पोहचलीय. (Photo: PTI/AFP)या बाहुलीला ‘मोक्को’ नाव पटकथा लेखक कानकुरो कुडो यांनी दिलंय. ते जपानचे हास्य कलाकार आणि लेखक नाओकी मातायोशी यांनी लिहिलेल्या ‘मोक्को की कहानी’पासून प्रभावित आहे. (Photo: PTI/AFP)


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area