पंतप्रधानांचा कोल्हापूरवरच अन्याय का?

 


राज्यातील इतर जिल्ह्यांत कोरोना प्रतिबंधक (covid-19) लस मुबलक मिळते; पण त्याचवेळी कोल्हापुरात (kolhapur) लस का मिळत नाही? याला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM modi) यांचे लस (corona vaccine update) धोरण चुकीचे असल्याचे कारण सांगितले जात आहे.

इतर जिल्ह्यांत मुबलक प्रमाणात लस मिळत असताना पंतप्रधान मोदी यांचा कोल्हापूरवरच अन्याय कसा, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतो.

सद्यःस्थितीत कोरोना महामारीत काम करणारे व ६० वर्षांवरील व्यक्तींसह व्याधीग्रस्त, दिव्यांगांनाच लस दिली जाते, तीही पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने लोकांच्या संतापाचा उद्रेक होत आहे.

जिल्ह्यात ७० टक्के नागरिकांचे लसीकरण (corona vaccine update) पूर्ण झाल्याशिवाय जीवनमान सुरळीत होणार नाही, असे मंत्री सांगतात. त्यासाठी पुरेसा लसपुरवठा व्हावा, यासाठी मात्र त्यांचे प्रयत्न दिसत नाहीत. औरंगाबाद, पुणे, नाशिक, मुंबई या शहरांसह सांगली, सातारा जिल्ह्यांत लस मुबलक प्रमाणात मिळत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चुकीच्या धोरणामुळे तुटवडा असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या मंत्र्यांकडून होत आहे; पण राज्यासाठी केंद्राकडून लस पुरवठा झाल्यावर त्याचा जिल्हानिहाय पुरवठा करण्याचे नियोजन राज्य सरकारच्या हातात असते; पण त्यातच जिल्ह्यातील मंत्री पुरेशी लस आणण्यात कमी पडतात की काय, असा प्रश्‍न जिल्ह्यातील लस तुटवड्यावरून उपस्थित होत आहे

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area