शक्तिशाली रेल्वे इंजिनची नागपुरात देखभाल

भारतीय रेल्वेच्या ताफ्यातील सर्वाधिक शक्तिशाली, १२ हजार हॉर्सपॉवर क्षमतेच्या रेल्वे इंजिनची देखभाल दुरुस्ती आता नागपुरात होणार आहे. त्यासाठी अजनी भागात केंद्र तयार केले जात आहे.

नऊ हजार टन वजन वाहून नेऊ शकणाऱ्या या इंजिनची गती प्रतितास १२० किलोमीटर असते. यापूर्वी आपल्या देशात ६ हजार हॉर्सपॉवर क्षमतेचे रेल्वे इंजिन होते. त्यांचा उपयोग मालगाड्या ओढण्यासाठी केला जायचा. आता आलेले १२ हजार हॉर्सपॉवरचे इंजिनदेखील मालगाड्यांसाठीच वापरण्यात येत आहे. या इंजिनमुळे रेल्वे मालवाहतुकीचा वेग प्रचंड वाढला आहे. कोळसा भरलेली ४० वॅगनची रेल्वेगाडी ओढण्यासाठी आधी तीन ते चार इंजिन जोडावे लागत होते. मात्र, आता हे एकच शक्तिशाली इंजिन हे काम करते. या इंजिनमुळे मालगाड्यांचा वेग वाढला आहे. आधी आपल्याकडे मालगाडीचा वेग प्रतितास ३० किलोमीटर इतका राहायचा. तो वेग आता वाढला आहे.

साडेसोळा एकर परिसरात कार्यशाळा

इंजिन दुरुस्तीसाठी साडेसोळा एकर परिसरात कार्यशाळा तयार केली जात आहे. मधेपुरा इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह प्रा. लि. या कंपनीकडे याची जबाबदारी दिली आहे. या कामासाठी ३० कोटी रुपये खर्च येणार आहे. १२ हजार हॉर्सपॉवरचे इंजिन मधेपुरा बिहार येथील कारखान्यात तयार केले जातात. एका इंजिनसाठी २५ ते ३० कोटी रुपये खर्च येतो.

    Post a Comment

    0 Comments
    * Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

    Ads Area