….तर आ. प्रकाश आवाडे करणार हसन मुश्रीफ यांचा सत्कार

 

local politics news- इचलकरंजी येथील आयजीएम हॉस्पिटल अद्ययावत करण्यासाठी तसेच आवश्यक उपकरणे, साहित्य व मशिनरी खरेदीसाठी ५५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

प्रतिवर्षी ११ कोटींप्रमाणे पाच वर्षांचा निधी आयजीएम हॉस्पिटलसाठी मिळणार असल्याची माहिती आ. प्रकाश आवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आयजीएमसाठी नेहमी प्रयत्नशील राहीन व या हॉस्पिटलला राज्यातील एक उत्तम हॉस्पिटल म्हणून नावारूपास आणनार असे आ. प्रकाश आवाडे म्हणाले. (local politics news)

हसन मुश्रीफ यांनी अनेक आश्वासने दिली आहेत जसे की आयजीएम हॉस्पिटलसाठी निधि देऊ, यंत्रमाग कामगारांसाठी निधि, वस्त्रोद्योगाच्या समस्या मार्गी लावण्यासह विकासासाठी निधी देऊ इत्यादि, ही आश्वासने हसन मुश्रीफ यांनी जर पूर्ण केली तर मी स्वतः आ. प्रकाश आवाडे त्यांचा सत्कार करेन असे आवाडे यांनी पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area