बंदी असतानाही बैलगाडा शर्यतीचे आयोजन करणे पडले महागात

 


पुणे :बंदी असतानाही महापालिकेच्या हद्दीतील गुजरवाडी येथे बैलगाडा शर्यतीचे आयोजन करणाऱ्या आणि त्यात सहभागी झालेल्या ११ जणांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. यापूर्वी तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

गुजरवाडीतील बाबरमळा येथील डोंगराच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेवर शनिवारी (१७ जुलै) सकाळी साडेनऊ ते साडेदहा या वेळेत ही शर्यत झाली. या शर्यतीची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. या प्रकरणी १४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या वेळी तीन जणांना अटक केली होती.


योगेश बाळासाहेब रेणुसे, मयूर दिलीप शेवाळे, पंढरीनाथ जगन फडके, वामन विनायक फडके, हरिश्चंद्र भागा फडके, पद्माकर रामदास फडके, हृषीकेश सूर्यकात कांचन, संकेत शशिकांत चोरगे, यश राजू श्रिगारे, संतोष शिवराम कुडले यांना सोमवारी अटक करण्यात आली. शर्यतीसाठी आणलेले तीन बैल, लाकडी छकडा, टेम्पो, फॉर्च्युनर, ब्रिझा गाडी असा एकूण २८ लाख पाच हजार रुपयांचा माल जप्त केला, अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी दिली.

बैल गोशाळेत रवाना


या बैलगाडा शर्यतीचे नियोजन संतोष ननवरे, राहुल चौधरी, बाळासाहेब खोपडे, तात्या मांगडे यांनी केल्याचे निष्पन्न झाले. या बैलगाडा शर्यतीसाठी पनवेल, भोर, वेल्हा, उरळी कांचन, खडकवासला, नसरापूर या परिसरातून लोक आले होते. पोलिसांनी गुन्ह्यात जप्त करण्यात आलेले बैल संरक्षण आणि पालनपोषणासाठी गोशाळेत जमा केले आहेत.

    Post a Comment

    0 Comments
    * Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

    Ads Area