पुण्यातच बैलगाडी शैर्यतीचे आयोजन; तिघांना अटक

 

पुणे: बंदी असतानाही पुणे महापालिकेच्या हद्दीत नुकत्याच समाविष्ट झालेल्या गुजरवाडी येथे शनिवारी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणी पोलिस हवालदार रवींद्र ओझय्या चिप्पा यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून १४ जणांवर गुन्हा दाखल झाला असून, तिघांना अटक केली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार बैलगाडा शर्यतींच्या आयोजनावर बंदी असतानादेखील गुजरवाडीतील बाबरमळा येथील डोंगराच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेवर ही शर्यत आयोजिण्यात आली होती.
  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (१७ जुलै) सकाळी साडेनऊ ते साडेदहा या वेळेत ही शर्यत झाली. बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यावर न्यायालयाने बंदी घातलेली असताना आणि करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लागू असणाऱ्या प्रतिबंधात्मक आदेशाकडे काणाडोळा करून आरोपींनी बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते. या वेळी बैलांना गाड्यांना जोडून निर्दयीपणे मारहाण करून, त्यांच्या शेपट्या पिरगाळून जबरदस्तीने पळविण्यात आले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपायुक्त, सहायक आयुक्त, वरिष्ठि निरीक्षक आदींनी घटनास्थळी भेट दिली. मावळातील शिवणे गावात गेल्याच आठवड्यात बैलगाडा शर्यत पार पडली होती.

  पोलिस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की

  बैलगाडा शर्यतीचे आयोजक आणि शर्यत पाहण्यासाठी जमलेल्या नागरिकांना 'बैलगाडीची शर्यत आयोजिणे आणि पाहणे बेकायदा आहे,' असे पोलिस हवालदार रवींद्र चिप्पा समजावून सांगत होते. मात्र, त्या वेळी आयोजकांपैकी काही जणांनी चिप्पा यांच्याशी वाद घालून त्यांना धक्काबुक्की केली

  Post a Comment

  0 Comments
  * Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

  Ads Area