इमारतीतील रहिवाशाला मारहाण, पुण्यात भाजप नगरसेविकेच्या पती आणि भावाचा व्हिडीओ व्हायरल

 

पुणे : भाजप नगरसेविकेच्या पती आणि भावाने त्यांच्याच इमारतीत राहणाऱ्या रहिवाशाला मारहाण केल्याचा आरोप आहे. पुणे शहरातील औंध परिसरात घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. औंधच्या भाजप नगरसेविका अर्चना मुसळे (Archana Musale) यांचे पती मधुकर मुसळे आणि भावावर मारहाणीचा आरोप आहे. (Pune BJP Corporator Archana Musale Husband Brother beaten up neighbor video viral)

नेमकं काय घडलं?

भाजप नगरसेविका अर्चना मुसळे यांचे पती आणि भावाने त्यांच्याच इमारतीत राहणाऱ्या एका नागरिकाला मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मुसळे या औंध परिसरातील क्लोरियन पार्क या इमारतीत वास्तव्यास आहेत. मारहाण झालेली व्यक्तीही याच इमारतीत राहत असल्याची माहिती आहे.

काय आहे व्हिडीओ?

“सोसायटीत आपली बदनामी करणारी पत्र का वाटली? त्यावर तुझीच सही आहे ना?” असा जाब मुसळे विचारत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. व्हिडीओ मारहाणीसोबतच शिवीगाळ झाल्याचंही ऐकू येत आहे. तर “मला यासंबंधी काहीही बोलायचं नाही. सोसायटीच्या मॅनेजिंग कमिटीमध्ये मी सांगेन” असं संबंधित रहिवासी बोलताना ऐकू येतं.

पोलिसात परस्परविरोधी तक्रार

दरम्यान, याबाबत पुण्यातील चतु:श्रुंगी पोलिस ठाण्यात दोघांनीही एकमेकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

शिवसेनेत अंतर्गत राडा

दुसरीकडे, अहमदनगर महापौरपदाच्या निवडणुकीच्या आदल्या रात्रीच शिवसेनेच्या दोन गटात राडा पाहायला मिळाला होता. महापौर निवडीवरुन अहमदनगरमधील शिवसेना नगरसेवकांमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास वादावादी झाली. यावेळी शिवसेना नगरसेविकेचे पती निलेश भाकरे यांना मारहाण झाल्याचा आरोप आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area