पुण्यात गाडी अडवून दोघा भावांना मारहाण

 

पिंपरी : रस्त्यात गाडी अडवून दोघा भावांना तीन जणांनी मिळून शिवीगाळ करून मारहाण केली; तसेच कोयता घेऊन पाठलाग करून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार शनिवारी (१७ जुलै) तळेगाव दाभाडे येथील जिजामाता चौकात घडला.


या प्रकरणी निखिल अरुण कोडितकर (वय २२, रा. तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अजय भंडलकर (वय २३), किरण ढेबे (वय २७) आणि नितीन फाटक (वय २६, सर्व रा. तळेगाव दाभाडे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचा मोठा भाऊ शनिवारी रात्री साडेदहा वाजता मासळकरवाडी तेथून गाडीत डिझेल भरून जिजामाता चौकात आले. त्या वेळी आरोपी फाटक याने रस्त्यात उभे राहून गाडी अडवली. फिर्यादी य़ांना खाली उतरण्यास सांगून शिवीगाळ केली. यावरून फिर्यादी आणि आरोपींमध्ये सुरू झाली. यानंतर इतर आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या भावाला मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपी फाटक याने कोयता घेऊन फिर्यादी यांचा पाठलाग केला. पुढील तपास तळेगाव ताभाडे पोलिस करत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area