पुणे : गुटख्याची साठवणूक करून बेकायदा वाहतूक; दोघांवर गुन्हा दाखल

 


पिंपरी : गुटख्याची साठवणूक करून बेकायदा वाहतूक केल्याप्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुटख्याची वाहतूक करणाऱ्यास पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी (१२ जुलै) दुपारी धावडेवस्ती, भोसरी येथे सामाजिक सुरक्षा विभागाने केली.

परशुराम प्रदीप ढेपे (वय १९, रा. एमआयडीसी भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह साथीदार चंद्रकांत ऊर्फ बंटी विश्वनाथ जगदाळे (वय २९, रा. शिवगणेश नगर, गुळवे वसाहत, भोसरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलिस नाईक जालिंदर गोरे यांनी याबाबत भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धावडेवस्ती परिसरात एक तरुण गुटखा विक्री करत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून परशुराम ढेपे याला दुचाकीसह ताब्यात घेतले. त्याच्या दुचाकीवर असलेल्या पांढऱ्या रंगाच्या पोत्याची तपासणी केली असता त्यात पोलिसांना ५८ हजार ६४० रुपये किमतीचा गुटखा मिळाला. पोलिसांनी गुटखा आणि ५० हजारांची दुचाकी असा एकूण एक लाख ८ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. भोसरी पोलिस तपास करीत आहेत.


मेडिकल फोडून चोरी

शिवाजीवाडी मोशी येथील मेडिकल अज्ञात चोरट्यांनी फोडले. मेडिकलमधून २८ हजार ७५० रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना मंगळवारी (१३ जुलै) पहाटे साडेपाच वाजता उघडकीस आली. नारायण घीसाराम चौधरी (वय २२, रा. शिवाजीवाडी, मोशी) यांनी याबाबत एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चौधरी यांचे रिलॅक्स मेडिको केमिस्ट अँड ड्रगिस्ट नावाचे मेडिकल आहे. सोमवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास चौधरी यांनी मेडिकल बंद केले. त्यानंतर रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी लॉक आणि कोयंडा तोडून आतमध्ये प्रवेश केला. दुकानातून लॅपटॉप, मोबाइल, घड्याळ, रोख रक्कम; तसेच रेनकोट असा एकूण २८ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.इंद्रायणी नदीत तरुण बुडाला

पिंपरी : मित्रांसोबत पोहायला गेलेला १८ वर्षीय तरुण देहूगावाजवळ इंद्रायणी नदीत बुडाला. बुधवारी (१४ जुलै) दुपारी बाराच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. दरम्यान, घटनास्थळी देहूरोड पोलिस आणि 'एनडीआरएफ'चे जवान दाखल झाले असून, शोधमोहीम सुरू आहे.

आदेश सुरेश हागवणे (वय १८, रा. विठ्ठलवाडी, देहूगाव) असे नदीत बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आदेश आणि त्याचे तीन मित्र देहूगावाजवळील बोडकेवाडी येथे इंद्रायणी नदीत पोहायला गेले होते. पोहताना आदेश नदीत बुडाला. आदेश इयत्ता बारावीत शिकत होता.
Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area