मुलीच्या मृत्यूनंतर 'पॉलिटिकल ड्रामा'; आई-वडिलांचा वानवडी पोलिस ठाण्यात जबाब

 

पुणे : मुलीच्या आत्महत्येप्रकरणी आमचा कोणावरही आरोप नाही; तसेच तिच्या मृत्यूनंतर या विषयाला राजकीय वळण देण्यात आले. त्यानंतर जे काही घडले तो सर्व पॉलिटिकल ड्रामा होता, असा जबाब आत्महत्या केलेल्या तरुणीच्या आई-वडिलांनी वानवडी पोलिसात नोंदवला असल्याची खात्रीलायक माहिती पुणे पोलिस दलातील एका अधिकाऱ्याने दिली.

एका तरुणीने सात फेब्रुवारीला महंमदवाडी येथे इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. त्यांनतर या आत्महत्या प्रकरणाला वेगळे लागले. तत्कालीन वनमंत्री
  संजय राठोड यांचा या प्रकरणाशी संबंध असल्याचा आरोप झाला होता. त्यांनतर विरोधी पक्षांनी हे प्रकरण उचलून धरले होते. त्यामुळे राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता. तरुणीने आत्महत्या केल्यानंतर काही दिवसांनी वानवडी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती. त्या अंतर्गत वानवडी पोलिसांनी काही दिवसांपूर्वी तरुणीच्या आई-वडिलांचा जबाब नोंदवून घेतला आहे. याबाबत वानवडी पोलिसांनीदेखील दुजोरा दिला आहे.  तिच्या आई-वडिलांनी पुण्यात येऊन जबाब नोंदवला. त्यात त्यांनी पूजाच्या आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरले नसून, तिच्या आत्महत्येनंतर पॉलिटिकल ड्रामा झाल्याचा आरोप आपल्या जबाबात केला आहे.

  फॉरेन्सिक अहवालाचे काय?

  तरुणीच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर फोन कॉल्सचे रेकॉर्डिंग व्हायरल झाले होते. ते रेकॉर्डिंग तिच्या मोबाइलमधील असल्याचे बोलले जात होते. तसेच, तिच्या लॅपटॉपमध्ये विविध ठिकाणचे आणि काही व्यक्तींसोबतचे फोटो होते. त्यामुळे या प्रकरणात तिचा मोबाइल आणि लॅपटॉपमधून अनेक गोष्टी समोर येण्याची शक्यता होती. पोलिसांनी त्या दोन्हीचे फॉरेन्सिक ऑडिट केले आहे का, त्याचा अहवाल आला आहे का, याची माहिती गोपनीय ठेवण्यात आली आहे.

  Post a Comment

  0 Comments
  * Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

  Ads Area