गेहना वशिष्ठच्या अटकेनंतर घाबरला होता राज कुंद्राचा पीए उमेश कामत, वाचा साथीदार यश ठाकूरसोबतचं संभाषण

 

मुंबई : अश्लील चित्रपट प्रकरणी अटकेत असलेल्या राज कुंद्राचा (Raj Kundra) बचाव करणारी अभिनत्री गेहना वशिष्ठ (Gehana Vasishth) 7 फेब्रुवारीला जेव्हा तिला अटक करण्यात आली, तेव्हा राज कुंद्राचा पीए म्हणून काम करणारा उमेश कामत (Umesh Kamat) आणि अश्लील चित्रपटांमध्ये मोठं नाव असलेला यश ठाकूर (Yash Thakur) हे दोघेही घाबरून गेले होते. यश ठाकूर न्यूफ्लिक्स (NUEFLIKS)  नावाचा एक पोर्नोग्राफी डिजिटल प्लॅटफॉर्म चालवत होता.

7 फेब्रुवारी रोजी जेव्हा गेहनाच्या अटकेची बातमी आली, त्यानंतर उमेश कामत आणि यश ठाकुर यांच्यामध्ये जो काही संवाद झाला, त्याची माहिती समोर आली आहे.

काय झाला संवाद?

यश ठाकूर : गेहनाला अटक करण्यात आली आहे. आज रात्रीपर्यंत तिला सोडवण्यासाठी मला 8 लाख रुपये हवे आहेत.

उमेश कामत : पण बँकेतून पैसे कसे काढायचे?  सध्या त्याचा फोन बंद आहे. आपण काय करायचं ते मला सांग…

यश ठाकूर : मीडियाने बातमी प्रसिद्ध केली आहे. ही आता एक मोठी लढाई आहे.

उमेश कामत : न्यूफ्लिक्स (NEUFLIKS)चं नाव आलं आहे का?

यश ठाकूर : नाही अजून नाही, पण जर ती कोर्टात गेली तर ती सर्वांचे नाव देईल. हॉटशॉट्स, तुमचं (उमेश कामत), न्यूफ्लिक्स. तिला काढावं लागेल, अन्यथा हा आणखी किती संकट येईल माहित नाही.

पण मला अजूनही शंका आहे, तुम्हाला माहिती आहे, जेव्हा गेहनाकड़े न्यूफ्लिक्सचा कुठलाही प्रोजेक्ट नव्हता, तेव्हा गेहना हॉटहिटच्या कास्टिंगसाठी पोलिसांनी जो सापळा रचला, त्यात गेहना का पोलिसांना प्रत्युत्तर देत होती. एकतर गेहनाचा Hothit  सोबत संबंध आहे. जर रोवा उर्फ यास्मीन खानने आपले (उमेश कामत), मुकेशचे नाव घेतले असते, तर पोलीस फक्त गेहनाच्या घरी का जातील?

थोडा वेळ  संभाषणानंतर यश ठाकूर गेहनाच्या अटकेची बातमीची लिंक पोस्ट करतो. ज्यानंतर उमेश कामत म्हणतो की, मी एक महिन्यासाठी शिमला येथे जाण्याचा विचार करत आहे. मी तेथेच शूट करून घेणार.

यश ठाकूर : बेस्ट आहे, जर तू सुरक्षित असशील तर माझ्या मनालाही शांतता असेल.

उमेश कामत : मी मग निघून जातो.

दरम्यान या चॅटमुळे हे समोर आला आहे की, अभिनेत्री गेहना वशिष्ठ, राज कुंद्राचा पीए उमेश कामत्त आणि यश ठाकुर हे एकमेकांशी जोडलेले होते.

(Raj Kundra’s PA Umesh Kamat was scared after the arrest of Gehna Vashisht, read the conversation with his partner Yash Thakur)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area