आणि अभिनेता रजनीकांत खरंच मंचावर पडले? वाचा व्हायरल व्हिडीओ मागील सत्य

 


मुंबई : बॉलिवूडमध्ये प्रत्येक अभिनेत्याने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या अभिनेत्यांमध्ये अभिनेता रजनीकांत हे देखील जगप्रसिद्ध  आहेत. रजनीकांत यांचे संपूर्ण भारतात लाखो चाहते आहे. दक्षिण भारतात तर रजनीकांत यांचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. याशिवाय आपल्या आवडत्या अभिनेत्याला जवळून बघावं अशी प्रत्येक चाहत्याची इच्छा असते. त्यामुळे अभिनेते अनेक सामाजिक कार्यक्रमांना हजेरी लावतात. पण प्रत्येक कार्यक्रमांना हजेरी लावणं त्यांच्यासाठी शक्य नसतं. अशावेळी अशा मोठ्या अभिनेत्यांसारखे हुबेहुब दिसणाऱ्या कलाकारांना आमंत्रित केलं जातं. ते प्रेक्षकांसमोर त्यांच्या लाडक्या अभिनेत्यासारखं बोलून दाखवतात. त्यांच्यासारखे वागतात. त्यामुळे लोकांना खोटा अभिनेताही खरा वाटायला लागतो 

अभिनेता रजनीकांत होणं सोपं नाही

सोशल मीडियावर रजनीकांत यांच्यासारखा हुबेहुब दिसणाऱ्या एका कलाकाराचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. खरंतर तो एक खोटा रजनीकांत आहे. त्याला आपण ड्युप्लीकेट रजनीकांतही म्हणून शकतो. त्या व्हिडीओमध्ये तो कलाकार रजनीकांत यांना कॉपी करण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. मात्र, त्या व्हिडीओमध्ये त्याची झालेली फजिती बघितली तर अभिनेता रजनीकांत होणं सोपं नाही, हे तुमच्या लगेच लक्षात येईल 

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत नेमकं काय?

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत एक व्यक्ती हुबेहुबे रजनीकांत सारखा दिसत आहे. तो मंचावर उभा आहे. मंचावर तबला वादक आणि इतर सदस्यही दिसत आहेत. व्हिडीओतील व्यक्तीची पांढऱ्या रंगाची दाढीदेखील अभिनेता रजनीकांत सारखी दिसत आहे. तो लोकांचं मनोरंजन करताना दिसत आहे. तो आपल्या मागे ठेवलेल्या खुर्चीला पायाने आपल्याकडे सरकवण्याचा प्रयत्न करतो. पण खुर्चीला मोठं खड्डं पडतं. त्यामध्ये त्याचा पाय फसतो आणि तो जमिनीवर खाली पडतो.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडीओ बघून अनेकांना हसू अनावर होत आहे. संबंधित व्हिडीओ इन्स्टाग्रामवर @official_niranjanm87 या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर अनेकांकडून विनोदी प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area