Ratnagiri Weather : रत्नागिरीमध्ये चिंता वाढली! 'या' दोन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी

 त्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्यांची पातळी वाढलेली दिसत आहे. आता मिळालेल्या ताज्या माहितीनुसार खेड येथील जगबुडी नदीने व राजापूर येथील कोदवली नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. यामुळे नद्यांशेजारील सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जगबुडी नदीची इशारा पातळी ६ इतकी असून सध्याची पातळी ६.५० इतकी आहे. तर कोदवली नदीची इशारा पातळी ४.९० इतकी असून सध्याची पातली ६.०० इतकी आहे. अशात जर पाऊस आणखी वाढला तर परिसरात पूर येण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, रत्नागिरीमध्येही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

रत्नागिरीमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे अनेक नद्यांना पूर आला असून नजिकच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आज सकाळी अर्जुना नदीमध्ये रायपाटण गांगणवाडी येथून विजय शंकर पाटणे वय.70 रा. खेड हे वाहून गेले आहेत. नदी पात्रामध्ये शोध मोहिम सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

संगमेश्वर व लांजा परिसरात अजूनही मुसळधार पाऊस पडत आहे. राजापूर शहरातही पुन्हा पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. पावसाचा जोर वाढत असल्यानं राजापूरमधील अर्जुना व कोदवली या नद्यांना पुन्हा पूर आला आहे. मुख्य चौक असलेल्या जवाहर चौकाला पाण्याचा वेढा बसला आहे. पाण्याची पातळी वाढत असल्याने व्यापारी व नागरिक सतर्क झाले आहेत. पोलीस, नगरपरिषद प्रशासन २४ तास सतर्क झाले असून परिस्थिती आटोक्यात आणण्याच्या प्रयत्नात आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area