सांगलीतील पूरग्रस्तांपेक्षा लवकरच मदत देण्यात आलीय; संजय राऊतांचा विरोधकांना टोला

 

मुंबई: राज्यातील पूरग्रस्तांना मदत मिळाली नसल्याचा दावा करणाऱ्या विरोधकांवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे. मागच्यावेळी सांगलीत पूर आला होता. त्याच्यापेक्षा पूरग्रस्तांना आता लवकर मदत मिळाली आहे, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी लगावला आहे. (sanjay raut attack bjp over maharashtra flood situation)
शिवसेना नेते संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना हा टोला लगावला. आकाश फाटल्यासारखा पाऊस पडत आहे. नैसर्गिक संकट असलं तरी सरकार कुठेही कमी पडलेलं नाही. नियंत्रण ठेवणं सरकारचं काम आहे. ते काम सरकार करत आहे. पूरग्रस्ताना मदत उशिरा पोहचली असा आरोप केला जातोय. उशिरा म्हणजे काय? लवकर म्हणजे काय? हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही. सांगलीपेक्षा लवकरच मदत देण्यात आली आहे, असं राऊत म्हणाले


मुख्यमंत्री दु:खी

राज्यात ढगफुटी झाली. मुख्यमंत्री मंत्रालयात होते. नियंत्रण कक्षात बसून सगळ्या गोष्टींवर त्यांचे लक्ष होते. या घटनेमुळे मुख्यमंत्री दु:खी होते. केंद्राच्या संपर्कात राहून त्यांना माहिती देत होते. मागच्या वर्षीपेक्षा जलदगतीने काम करत होते. पूरग्रस्तांना मदत मिळते की नाही यावर मुख्यमंत्र्यांचं लक्ष आहे, असंही त्यांनी सांगितलं.

खोलवर तपास झालाच पाहिजे

यावेळी त्यांनी पेगासस प्रकरणावरही त्यांनी भाष्य केलं. राजकारणात हे नवीन नाही. आपल्या देशात हेरगिरी होत आहे. त्याची कारणं उघड झाली पाहिजे. पेगाससद्वारे हेरगिरी करणं सोपं नाही. त्यासाठी खूप पैसे मोजावे लागतात. ते पैसे कुठून आले. याची माहिती मिळाली पाहिजे. 350 कोटीच्यावर कोणी तरी पेगाससला दिले आहेत. हे पैसे कुणाच्या खात्यातून देण्यात आले. त्यामागचा सूत्रधार कोण आहे? विरोधकांवर पाळत ठेवली जाते. भाजपला दुसरे काम नाही का? विरोधकांवर टीका करण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरे काम नाही, असं सांगतानाच देशात अशा घटना वारंवार होत आहेत. कुणाला विरोधकांची भीती वाटत आहे, याचा खोलवर तपास झालाच पाहिजे, असं ते म्हणाले. (sanjay raut attack bjp over maharashtra flood situation)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area