औरंगाबादचे विद्यार्थी म्हणणार ‘स्कूल चले हम…’, कोरोनामुक्त गावांतील शाळा सुरु होणार!

 


औरंगाबाद : कोरोना संसर्गामुळे राज्यातील सर्व शाळा बंद झाल्या. घंटा वाजायच्या थांबल्या. मात्र आता परिस्थिती आटोक्यात आल्याचं चित्र दिसल्यानंतर कोरोनामुक्त गावात इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यानुसार औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामपंचायत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ठराव घेऊन व पालकांच्या संमतीने हे वर्ग सुरु करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. 

शाळा सुरु करण्याच्या हालचाली

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनामुक्त असलेल्या 901 गावांमधील 1368 शाळा सुरू करण्याची चाचपणी सुरु आहे. शासनाच्या चौकटीत बसणाऱ्या शाळा पंधरा तारखेपासून सुरू करु, असं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मंगेश गोंदावले यांनी सांगितले.

1368 शाळा सुरु करण्याची चाचपणी

गेल्या अनेक महिने कोरोनामुळे शाळा बंद होत्या. परंतु शाळा जरी बंद असल्याने विद्यार्थ्य्यांचा ऑनलाईन क्लास सुरु होता. मात्र यामध्ये अनेक अडचणी उभ्या राहत होत्या. ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांकडे मोबईल नव्हते, मोबईल आले तर नेटवर्क मिळत नव्हतं… अशा एक ना अनेक अडचणींना शिक्षणामध्ये दरम्यानच्या काळआत अडचणी आल्या. आता कोरोनाची परिस्थिती हळहळू सावरायला सुरुवात झाल्यानंतर औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनामुक्त असलेल्या 901 गावांमधील 1368 शाळा सुरू करण्याची चाचपणी सुरु असल्याची माहिती जि.प. चे सीईओ डॉ मंगेश गोंदावले यांनी दिली.

काय म्हणाले मुख्य कार्यकारी अधिकारी…?

कोरोना परिस्थिती नियंत्रणात येत आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा आता शासनाच्या संकेतानुसार सुरु करण्याच मानस आहे. त्यानुसार औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनामुक्त असलेल्या 901 गावांमधील 1368 शाळा सुरू करण्याची चाचपणी सुरु आहे. शासनाच्या चौकटीत बसणाऱ्या शाळा पंधरा तारखेपासून सुरू करु, असं औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांनी सांगितलं.

औरंगाबादमध्ये कोरोनाची परिस्थिती कशी?

औरंगाबाद जिल्ह्यात शुक्रवारी एकूण 47 कोरोना बाधित रुग्णांची नव्याने भर पडली. शहरातील 22 तर ग्रामीण भागातील 25 रुग्णांचा समावेश आहे. शुक्रवारी जिल्ह्यातील 3 रुग्णांचा मृत्यू झाला. आता जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 46 हजार 640 इतकी झाली आहे. आजपर्यंत एकूण 3 हजार 451 रुग्णांचा मृत्यू झालाय तर आज 83 रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले. शहरातील 11 तर ग्रामीण भागातील 72 रुग्णांनी काल कोरोनावर मात केली. आतापर्यंत 1 लाख 42 हजार 755 रुग्णांना कोरोनावर मात केलीय. तर सध्या 440 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area