कोल्हापूर : कृषी विद्यापीठाचं उद्घाटन; शरद पवारांनी सुरुवातीलाच दिल्या 'या' सूचना

 कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील तळसंदे येथील डी. वाय. पाटील. कृषी व तंत्र विद्यापीठाचे गुरुवारी माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि खासदार


शरद पवार यांच्या हस्ते झालेल्या कार्यक्रमात व्हर्च्युअल उद्घाटन झाले. या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी डी. वाय. पाटील ग्रुपचे संस्थापक व माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील हे होते.

शरद पवारांनी या कृषी विद्यापीठाचं उद्घाटन करत असतानाच भविष्यातील वाटचाल कशी असावी, याबाबतच्या सूचना दिल्या आहेत.

नक्की काय म्हणाले शरद पवार?

'देशातील ५८ टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. शेतीचे अर्थकारण सुधारल्याशिवाय समाजातील शेवटच्या घटकाची उन्नती होणार नाही. जीन्समध्ये बदल करून तयार होणाऱ्या बियाण्यापासून अधिक उत्पादन मिळते, मात्र अशी जीएम बियाण्याबाबत युरोप आणि अमेरिकेत एका बाजूला विरोध करून चळवळी उभारतात आणि दुसऱ्या बाजूला हेच देश यातून भरमसाठ उत्पादन घेत आहेत. हा विरोधाभास लक्षात घेता, आपल्याही देशाने जे जे शक्य आहे ते सर्व संशोधन करावे, आणि जीएम सारख्या बियाण्यांचा वापर करून स्वयंपूर्ण होण्याची गरज आहे.देशात कृषी संशोधनासाठी ८० संस्था आणि पाच हजार शास्त्रज्ञ कार्यरत आहेत. त्यांच्या ज्ञानाचा उपयोग शेतकरी यांना व्हावा यासाठी डी वाय पाटील कृषी विद्यापीठाने समन्वय साधत हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्यासाठी मध्यस्थाची भूमिका बजावावी,' अशा सूचना शरद पवार यांनी यावेळी दिल्या.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area