‘अनेकांच्या मनातील गुदमरणारे विषय मोकळे केलेस!’ सोशल मीडियावर होतेय अभिनेत्री हेमांगी कवीचे कौतुक!

 


मुंबई : प्रसिद्ध मराठी अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi) सोशल मीडियावरुन अनेक बोल्ड मानल्या जाणाऱ्या विषयांवर दिलखुलास मतं व्यक्त करत असताना दिसत असते. यावेळी हेमांगीने “बाई, बुब्स आणि ब्रा” या चार चौघात चर्चेसाठी निषिद्ध मानल्या जाणाऱ्या विषयावर भाष्य केलं आहे. “ज्यांना ब्रा आवडीने घालाविशी वाटते, ज्या कम्फर्टेबल आहेत, त्यांनी ती जरुर घालावी, मिरवावी, काहीही! त्यांची निवड! पण ज्यांना नाहीच आवडत त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने का बघितलं जावं! किंवा हे का लादलं जावं?” असा मनमोकळा सवालही हेमांगीने विचारला आहे.

हेमांगीच्या या बेधडक पोस्ट नंतर नेटकऱ्यांनीही तिचे तोंडभरून कौतुक केले आहे. या दरम्यान अनेकांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. मात्र, याच वेळी काही लोक हेमांगीला बोल देखील लावत आहेत. तरीही बहुतांश नेटकऱ्यांनी तिचे कौतुकच केले आहे.

वाचा काय म्हणतात नेटकरी…

‘एकच नंबर लेख लिहीलाय हेमांगी मॅडम, वस्तुस्थिती मांडली आहे आपण आजची. फार कमी लोकांन मध्ये असते अशी हिम्मत स्पष्ट बोलण्याची. मी कधी आपल्या सीरिअल्स किवा चित्रपट नाही पाहिले पण आपले विचार पाहून मी आपला पक्का पंखा झालो हे मात्र नक्की.’ असे एका चाहत्याने म्हटले आहे. तर, आणखी एक चाहती म्हणते, ‘मी आवर्जुन तो उल्लेख केलेला व्हिडिओ पुन्हा पाहिला बट स्टिल्ल मला त्यात खटकण्यासारखे काही मिळाले नाही.लक्ष पोळी वर होते.या अनुषंगाने मला तो myntra लोगो वाला किस्सा आठवतोय, अश्लीलता सर्वप्रथम पाहणाऱ्याच्या डोक्यात असते,मग ती डोळ्यांना दिसते. असो. बाकी अश्या लोकांना ही शाल जोडीतली चपराक ठरो!!! तुला खूप खूप प्रेम व आदर पूर्वक पाठींबा’.

‘लेखाची दिशा अशी आहे की, काही दिवसांनी मुलींनी कपडे का घालायचे ही चळवळ येइल आणि कपडे न घालता फिरतील बायका जगात बहुतेक! बोल्ड विषय नक्की पण आवश्यक नाही वाटत,’ अशा आशयाचीही एक कमेंट नेटकऱ्यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area