युवी पिढी नैराश्यात, MPSC परीक्षा घ्या आणि प्रलंबित नियुक्त्याही द्या; रोहित पवार यांची सरकारला विनंती मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यानं अखेर पुण्यात एका तरुणाने गळफास घेत आत्महत्या केलीय. स्वप्नील लोणकर असं या तरुणाचं नाव आहे. नैराश्यातून त्याने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सरकारकडे विनंती करत MPSC परीक्षा त्वरित घेण्यात याव्यात तसंच प्रलंबित नियुक्त्याही तातडीने देण्यात याव्यात, असं म्हटलं आहे. (Take the MPSC exam and also give pending Appointment Demand Rohit pawar)

युवी पिढी नैराश्यात, MPSC परीक्षा घ्या आणि प्रलंबित नियुक्त्याही द्या

कोरोनामुळं स्थगित केलेली MPSC ची परीक्षा आणि प्रलंबित निकाल व नियुक्त्यांमुळं युवा पिढी नैराश्यात आहे. माझी राज्य सरकारला विनंती आहे की, आवश्यक ती सर्व दक्षता घेऊन ही परीक्षा त्वरित घेण्यात यावी आणि प्रलंबित नियुक्त्याही तातडीने देण्यात याव्यात, अशी मागणी रोहित पवार यांनी ट्विट करुन सरकारकडे केली आहे.

आणखी किती आत्महत्येची सरकार वाट पाहतंय…?

स्वप्निल लोणकर याच्या आत्महत्येनंतर विद्यार्थी चांगलेच पेटून उठले आहेत. ही आत्महत्या नव्हे तर हा व्यवस्थेने केलेला खून आहे, अशी तीव्र भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत. स्वप्निलने तर जीव दिला, आणखी किती जणांनी जीव द्यावा म्हणजे सरकारला जाग येईल, असा संतप्त सवाल विद्यार्थी विचारत आहेत.

याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मुलांची व्यथा ओळखून सरकारला विनंती करणारं ट्विट केलं आहे. सध्या परीक्षा होत नसल्याने आणि काही विद्यार्थ्यांना परीक्षा पास होऊन देखील नियुक्त्या मिळत असल्याने त्यांना नैराश्य आलं आहे. त्यामुळे सरकारने आवश्यक ती सर्व दक्षता घेऊन ही परीक्षा त्वरित घेण्यात यावी आणि प्रलंबित नियुक्त्याही तातडीने देण्यात याव्यात, अशी मागणी रोहित पवार अशी मागणी रोहित पवार यांनी केलीय.

भावी अधिकाऱ्यांची परवड थांबेना

उत्तीर्ण होऊनही नियुक्ती न झाल्यानं नाशिकमध्ये या विरोधात 19 जून रोजी आंदोलनही झालंय. स्पर्धा परीक्षांची जीव तोडून तयारी करणाऱ्या आणि त्यात यश मिळवणाऱ्या तरुणांचा संघर्ष काही थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. 2019 ला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या राज्यसेवेच्या परीक्षेचा निकाल 19 जून 2020 ला लागला. त्याला 1 वर्षे होऊन गेलं, तरीही अजून या निकालात निवड झालेल्या विद्यार्थ्यांची अजूनपर्यंत नियुक्तीच झालेली नाही. निवड झालेल्या तरुणांच्या नियुक्त्या रखडल्याने अखेर या भावी प्रशासकीय अधिकाऱ्यांचा संयम संपल्याचं चित्र नाशिकमध्ये दिसलं. या ठिकाणी निवड झालेल्या तरुणांनी ‘मी तहसीलदार, तरीही मी बेरोजगार’ असा फलक हातात धरुन प्रशासनाच्या या गोंधळाचा निषेध केलाय.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area