ठाणे: कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी ठाणे महापालिकेने कंबर कसली आहे. ठाणे महापालिकेने खासगी रुग्णालये आणि क्लिनिकमधील सुमारे 200 प्रतिनिधींना प्रशिक्षण दिलं. (thane corporation organise training to prevent Third wave of Corona)
ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात एक दिवसीय प्रशिक्षण सत्राचे आयोजन केले होते. तिसऱ्या लाटेत कोरोनाचा सामना करण्यासाठी अत्यावश्यक असणारी संपूर्ण यंत्रणा, म्यूकरमायकोसिस, लहान मुलाच्या आरोग्याची काळजी, ऑक्सिजन पुरवठा, बेड्स तसेच लसीकरण आदी बाबत मार्गदर्शन करण्यात आले. शहरातील खासगी हॉस्पिटल व क्लिनिकच्या प्रतिनिधींना यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.
महापालिका सज्ज
महापालिका क्षेत्रात सध्यस्थितीत कोरोनाचा संसर्ग कमी आहे. पण काही तज्ज्ञांनी कोव्हिड-19च्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शंका वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेची संपूर्ण यंत्रणा सुसज्ज आहे. शहरातील खासगी हॉस्पिटल व क्लिनिक यांनी देखील याबाबत सतर्क राहून कोरोनाची परिस्थिती योग्यरीत्या हाताळावी यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षण सत्रात शहरातील खासगी हॉस्पिटल व क्लिनिकच्या 200 प्रतिनिधींनी दूरदृशप्रणालीद्वारे उस्फुर्त सहभाग घेतला. यामध्ये वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. वैजयंती देवगेकर, बालरोग विभागाचे प्रा.डॉ. सुनील जुनागडे, डॉ. श्वेता बाविस्कर, उप आयुक्त अश्विनी वाघमळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. खुशबू टावरी, डॉ. अनिता कापडणे आणि डॉ. अदिती कदम यांनी मार्गदर्शन केले.
याबाबत मार्गदर्शन
या प्रशिक्षण सत्रात लहान मुलांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी?, त्यांच्यावर उपचार कसे करावेत?, म्यूकरमायकोसिस आजाराची लक्षणे आणि त्यावरील उपाययोजना, ऑक्सिजनचा उपलब्ध साठा व त्याचे नियोजन, नागरिकांच्या आवश्यकतेनुसार शहरातील ऑक्सिजन, आयसीयू बेड्स यांचे नियोजन, मृत्यू प्रमाणपत्र तसेच गरोदर महिलांचे लसीकरण आदी बाबत मार्गदर्शन करण्यात आले. (thane corporation organise training to prevent Third wave of Corona)