मनोज ठवकर मृत्यू प्रकरण : पोलिस उपनिरीक्षकासह तिघे कर्मचारी निलंबित

 

नागपूर: पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिव्यांग मनोज हरिभाऊ ठवकर यांच्या मृत्यूप्रकरणी पोलिस उपनिरीक्षकासह तिघांना निलंबित केले. उपनिरीक्षक मुकेश ढोबळे, शिपाई नामदेव चरडे व आकाश ऊर्फ आशिष शहाणे, अशी निलंबित अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे आहेत.


७ जुलैला पारडी चौकात ढोबळे, नामदेव, आकाश यांच्यासह पारडी पोलिस नाकाबंदी करीत होते. मनोज ठवकर (वय ३५, रा. शारदा चौक) व त्यांचे साथीदार मोपेडने (एमएच-४९-एएफ-५१११) जात होते. पोलिसांना बघताच मनोज यांचा साथीदार पळाला. पोलिस उपनिरीक्षक मुकेश ढोबळे यांनी मनोज यांना मोपेड थांबविण्याचा इशारा केला. मोपेडचा वेग अचानक वाढल्याने मोपेड समोर गेली. ढोबळे यांनी मोपेडला पकडले असता ते काही अंतरापर्यंत फरफटत गेले. यामुळे संतप्त पोलिसांनी मनोज यांना मारहाण केली. यात त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला. पारडी परिसरात तणाव निर्माण झाला होता. या घटनेची दखल घेत तडफाडकी ढोबळे यांच्यासह तिघांची पोलिस नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. याप्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपविण्यात आला. दरम्यान, नागरिक व राजकीय संघटनांच्या वाढत्या रोषामुळे तिघांना निलंबित करण्यात आले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area