Tokyo Olympics 2020 मध्ये सहभागी होणाऱ्या उत्तर प्रदेशातील खेळाडूंसाठी खुशखबर, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांची मोठी घोषणा

 


नवी दिल्ली : टोक्यो ऑलम्पिक (Tokyo Olympics) सुरु होण्यास काही दिवसच उरले आहेत. भारताचे 126 खेळाडू या स्पर्धांमध्ये सहभाग घेणार आहेत. दरम्यान या महान स्पर्धेत भारतासाठी पदक जिंकणाऱ्या खेळाडूसाठी उत्तर प्रदेश सरकारने (Uttar Pradesh Government) पुरस्कारांची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी घोषणा करत टोक्यो ऑलम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या उत्तर प्रदेशातील खेळाडूंना प्रत्येकी 10 लाख रुपयांचे बक्षिस (Cash Prize to Athelets) जाहिर केले आहे. तसेत स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना कोट्यवधी रुपयांच्या बक्षिसाची देखील घोषणा केली आहे. (Uttar Pradesh Players Participating in Tokyo Olympics Will Get 10 lakhs from Yogi Adityanath Government and Gold Medal winner will get 6 crors)

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातून ऑलम्पिकमध्ये सहभागी होणऱ्या 10 खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी या पुरस्कारांची घोषणा केली आहे. युपींमधून ऑलम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्यांमध्ये शूटर सौरभ चौधरीही सामिल आहे. सरकारने घोषणा केलेल्या पुरस्कांरानुसार सहभागी सर्व खेळाडूंना प्रत्येकी 10 लाख रुपये देण्यात येतील. तर सिंगल इवेंटमध्ये सुवर्णपदक मिळवणाऱ्या खेळाडूला 6 कोटी तर टीम इवेंटमध्ये सुवर्ण पदक मिळवणाऱ्या खेळाडूंना 3 कोटी रुपये बक्षिस म्हणून देण्याचा निर्णय़ राज्य सराकरने घेतला आहे.

18 खेळांध्ये 126 खेळाडू खेळणार

टोक्यों ऑलम्पिकमध्ये एकूण 18 प्रकारच्या खेळांमध्ये भारतीय  खेळाडू सहभाग घेणार आहेत. यावेळी स्पर्धेसाठी गेलेल्या भारतीय खेळाडूंची एकूण संख्या 126 आहे.  ही आतापर्यंत भारताकडून ऑलम्पिकमध्ये पाठवण्यात आलेली सर्वाधिक संख्या आहे. यावेळी भारताला ऑलम्पिकमध्ये सर्वाधिक पदक मिळण्याची शक्यता निशानेबाजी, तिरंदाजी आणि कुस्ती या खेळात आहे. भारतीय हॉकी संघाची कामगिरी पाहता त्यांच्याकडूनही चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.  भारताची महिला तिरंदाज दीपिका कुमारी टोक्यो ऑलम्पिकपूर्वीच जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर आली असल्याने देशाला तिच्याकडून खूप अपेक्षा आहेत.

क्रिकेटपटूंनी दिल्या शुभेच्छा

बीसीसीआयने त्यांच्या ट्विटरवरुन एक व्हिडीओ शेेअर केला होता. ज्यामध्ये त्यांनी ऑलम्पिकसाठी रवाना होणाऱ्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत.  या ट्वि्टमध्ये भारताचे आघाडीचे क्रिकेटपटू खेळाडूंना शुभेच्छा देत आहेत. तसेच सर्वांनी खेळाडूंना सपोर्ट करुन शुभेच्छा द्या असे कॅप्शनही बीसीसीआयने या व्हिडीओला दिले आहे. या व्हिडीओमध्ये मिताली राज, रोहित शर्मा, विराट कोहली, जेमिमा रोड्रिग्स, अजिंक्य रहाणे, हरलीन देओल हे भारतीय क्रिकेटपटू शुभेच्छा देत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area