पुरुष गुगलवर सर्वाधिक काय सर्च करतात? वाचा पहिल्या 5 गोष्टी

                                             
नवी दिल्ली : मागील काही वर्षांमध्ये पुरुषांमध्ये आपल्या आरोग्याबाबत नवीन क्रेज तयार झालीय. महिलांच्या सौंदर्यप्रसाधन वस्तूंप्रमाणे पुरुषांसाठी देखील अनेक वस्तू बाजारात लाँच करण्यात आल्यात. मात्र, त्यानंतरही अशा काही चुकीच्या आणि खोट्या गोष्टी आहे ज्यावर लोक आजही सहजासहजी विश्वास ठेवतात. इंटरनेटवर पुरुषांच्या लैंगिक आयुष्यापासून तर अगदी केस गळण्यापर्यंत अनेक चुकीच्या थियऱ्या मांडणाऱ्या वेबसाईट्सचा खच पडलाय (Top 5 Google search by mens regarding health myths including weak erections to hair loss).

पुरुष गुगलवर काय सर्च करतात?

नुकताच frommars.com ने एक संशोधन अहवाल जारी केलाय. यात पुरुष गुगलवर काय काय सर्च करतात याची माहिती देण्यात आलीय. या यादीतील सर्वाधिक सर्च होणाऱ्या 5 गोष्टींपासून पुरुषांनी वेळीच सावध झालं पाहिजे. या 5 गोष्टी खालीलप्रमाणे,

  1. कमकुवत इरेक्‍शन नपुसंकतेचं लक्षण आहे का या विषयावर 68,600 लोक दरवर्षी सर्च करतात.
  2. दाढी केल्यानं दाढीचे केस जास्त वाढतात का या विषयावर दरवर्षी सरासरी 68,400 लोक सर्च करतात.
  3. पुरुषांना ब्रेस्ट कँसर होतो का यावर सर्च करणाऱ्यांची संख्या 61,200 इतकी आहे.
  4. टोपी घातल्यानं किंवा शेंडी वाढवल्यानं पुरुषांचे केस गळतात का यावर सरासरी 52,100 लोक दरवर्षी सर्च करतात.
  5. व्यायामानंतर प्रोटीन लगेच घ्यावं की नंतर आणि कोणतं प्रोटीन घ्यावं यावर 51,000 लोकांनी सर्च केलंय.

तज्ज्ञांचं म्हणणं काय?

फार्मासिस्‍ट नवीन खोसला यांनी इरेक्शन आणि नपुंसकता याविषयीच्या चुकीच्या समजाविषयी माहिती दिली. ते म्हणाले, “जर एखाद्या पुरुषाला इरेक्‍शनमध्ये अडचण येत असेल तर तो नपुंसकच असेल असं नाही. त्याचं वेगळं कारणंही असू शकतं. ही अडचण वयोवृद्धांमध्ये अधिक असते. यात डायबिटीज, ओबेसिटी आणि उच्‍च रक्‍तदाबासारख्या अनेक अडचणी कारणीभूत असतात. आपल्या दैनंदिन आयुष्यात बदल करुन या अडचणींवर मात करता येते. यासाठी दारुपासून दूर राहणं आवश्यक आहे.”

दाढी केल्यानं केसांची अधिक वाढ होते?

दाढी केल्यानं केस वाढतात याचा कोणताही पुरावा अद्याप संशोधकांना मिळालेला नाही. केस वाढण्याची अनेक कारणं असतात. यात अधिक औषधं घेतली तरी केस वाढतात.

पुरुषांना ब्रेस्‍ट कँसर होतो का?

पुरुषांना महिलांइतका ब्रेस्ट कँसर होत नाही. मात्र, प्रमाण कमी असलं तरी पुरुषांनाही ब्रेस्ट कँसर होतो. वयाच्या 60 वर्षानंतर या समस्येला तोंड द्यावं लागू शकतं. त्यामुळे लक्षणांकडे बारकाईने पाहिलं पाहिजे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area