वडाळागावात विहिरीत सापडला मृतदेह; परिसरात खळबळ

 

 सिडको: वडाळा गावातील अण्णाभाऊसाठे नगर लगत असलेल्या एका पडक्या विहिरीत ३५ ते ४० वयाचा अनोळखी पुरुषाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. गळा आवळून खून केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याने या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला.


वडाळा गावातील पडक्या विहिरत दुर्गंधी येत होती. हिरामण साळवे हे शनिवारी (दि. २४) हे आपल्या शेतात गेले असता त्यांनी विहिरीत डोकवले. यावेळी एका पुरुषाचा मृतदेह विहिरीत तरंगताना आढळून आला. त्यांनी त्वरित इंदिरानगर पोलिसांना माहिती दिली. सिडको अग्निशमन दलाचे जवान व इंदिरानगर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी दोर व स्ट्रेचरच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला असून, याबाबत इंदिरानगर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक नीलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिक तपास करीत आहे.


वडाळागाव येथे पडक्या विहिरीत एका अनोळखी पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेत मृत्यदेह आढळून आला. प्रथम दर्शनी गळा आवळून खून केल्याचे आढळून आले आहे. त्याच्या डाव्या हातावरती मारुती व शंकराची पिंड गोंदलेले आहे. याबाबत काही माहिती असल्यास इंदिरानगर पोलिस स्टेशनला संपर्क साधावा.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area