औरंगाबाद : जमिनीच्या वादातून जवानास दांड्याने मारहाण; गुन्हा दाखल

 


वैजापूर : जमिनीच्या वादातून लष्करातील जवानास लाकडी दांड्याने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना तालुक्यातील सावखेडगंगा येथे रविवारी घडली. या प्रकरणी नऊ जणांविरुद्ध विरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोविंद बापूसाहेब पवार (३५) असे या घटनेतील जखमीचे नाव आहे. ते लष्करात कार्यरत असून, सध्या सुट्टीवर आहेत.

गोविंद पवार व ज्ञानेश्वर खटाणे यांच्या कुटुंबीयांमध्ये जमिनीचा जुना वाद आहे. या वादावर सध्या तहसील कार्यालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याच कारणावरून ज्ञानेश्वर खटाणे हा कुटुंबीयांसह तेथे आला. त्यांनी पवार यांना जबर मारहाण करून गंभीर जखमी केले. पवार यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या प्रकरणी गोविंद पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ज्ञानेश्वर खटाणे, परसराम खटाणे, विशाल खटाणे, सीताराम खटाणे, सागर खटाणे, रमेश खटाणे, आकाश खटाणे, एकनाथ खटाणे, उद्धव खटाणे (सर्व रा. सावखेड गंगा) या नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नवनाथ कदम करीत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area