विरारमधील आयसीआयसीआय बँकेच्या महिला उपव्यवस्थापकाची हत्या

 

वसई : आयसीआयसीआय बँकेच्या विरार शाखेत दरोडा टाकण्यासाठी आलेल्या माजी व्यवस्थापकाने बँकेतील महिला उपव्यवस्थापकाची गळा चिरून हत्या केली असून, एका महिला खजिनदारालाही जखमी केले आहे. नागरिकांच्या तत्परतेमुळे बँकेवर दरोडा टाकण्याचा या व्यवस्थापकाचा प्रयत्न फसला असून, नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

विरारच्या आयसीआयसीआय बँकेच्या शाखेत गुरुवारी सायंकाळी बँकेच्या उपव्यवस्थापक योगिता वर्तक आणि खजिनदार श्रद्धा देवरुखकर या कामानिमित्त थांबल्या होत्या. यावेळी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास बँकेचा माजी व्यवस्थापक अनिल दुबे बँकेत शिरला आले आणि थेट योगिता यांच्या केबिनमध्ये जाऊन त्यांची गळा चिरून हत्या केली. त्यानंतर बँकेतील रोख रक्कम आणि सोने घेऊन पोबारा करीत असताना, खजिनदार श्रद्धा यांनी अनिलला विरोध केला. मात्र, त्यांने श्रद्धा यांच्यावर हल्ला करीत त्यांनाही जखमी केले. श्रद्धा यांनी यावेळी आरडाओरड केल्याने नागरिकांनी अनिलला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area