भरधाव कारवर जेव्हा अजगर उडी घेतो तेव्हा… ; व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल

 


नवी दिल्ली : मानवाने ज्या वेगाने जंगले तोडून त्या ठिकाणी आपल्याला राहण्यासाठी मानवी वसाहती स्थापन केल्या, त्याच वेगाने प्राणी आता मानवाच्या वस्तीत शिरायला लागले आहेत. अलीकडच्या काळात जंगली प्राण्यांचे मनुष्य वस्तीत येणे वाढले आहे. याला मानवाने जंगली प्राण्यांच्या वास्तव्य ठिकाणी केलेले अतिक्रमण, घुसखोरी कारणीभूत आहे, असे म्हटले तर ते चुकीचे ठरणारे नाही. 

सोशल मीडियावर अजगराचा व्हायरल

मनुष्याच्या घराच्या आवारात येणाऱ्या प्राण्यांची अनेक नावे सांगता येतील. हल्ली तर बिबळ्याही मनुष्यवस्तीत अनेकदा नजरेस पडत आहे. दुसरी उदाहरण म्हणजे साप. आपण मनुष्य केवळ मोठमोठी इमारती उभ्या करत गेलो, घरे बांधत गेलो. याचदरम्यान सापासारख्या प्राण्याचे निवासस्थान असलेली बिळेसुद्धा गायब झाली. सापाच्याच बाबतीत बोलायचे झाल्यास आपण अजगराचे नाव ऐकताच भीतीने हादरून जातो. अनेकांची भीतीने गाळण उडते. काहींनी समोर साप आला तर समोर आपला मृत्यूच उभा राहिल्याचा त्यांना भास होतो. नुकताच सोशल मिडियावर अजगराचा एक भितीदायक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात अजगर रस्त्यावरील भरधाव कारवर हल्ला करतो. त्यानंतर जे घडते ते नक्कीच आश्चर्यकारक आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये?

या व्हिडिओमध्ये असे दिसते आहे की जंगलाच्या मध्यभागी असलेल्या रस्त्यावर एक अजगर घुसला आहे. हा अजगर तेथून जाणाऱ्या वाहनांवर हल्ला करतो. मग एक वेगवान कार तेथून जाते. अशावेळी हा अजगर त्या कारवार वेगाने उडी मारतो आणि कारवर चढतो. अजगर पाहून ड्रायव्हर गाडी थांबवतो. पुढे काय घडले, त्याची कल्पना तुम्ही केलीच असेल. अजगर कारमध्ये शिरण्याचा प्रयत्न करतो. ड्रायव्हरला आपल्या कारच्या खिडक्या बंद आहेत हे ठाऊक असूनही तो पुरता भेदरलेला असतो. दुसरीकडे अजगराने कारमध्ये शिरण्याची धडपड सुरु ठेवलेली असते. अजगर मात्र कारच्या खिडक्या बंद असल्यामुळे कारच्या आत येऊ शकला नाही आणि तो बोनेटमध्ये घुसला.

सर्पमित्राकडून अजगराची सुटका

या घटनेची माहिती स्नेक कॅचरला अर्थात सापाला पकडणाऱ्या सर्पमित्राला देण्यात आली. तो सर्पमित्र घटनास्थळी पोहोचला. त्याने कारचे बोनट उघडून आतमध्ये दबा धरून बसलेल्या अजगरला पकडले. मग तो सर्पमित्र त्या अजगराला एका झुडूपात घेऊन जातो. हा व्हिडिओ युट्यूब चॅनल लेटेस्ट साइट्सिंगने शेअर केला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ 35 हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. लोक हा व्हिडिओ खूपच पसंत करताहेत. लोकांनी हा व्हिडिओ केवळ एकमेकांशी शेअर केलेला नाही तर त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या कंमेंट्सही नोंदवलेल्या ​​आहेत. व्हिडिओ पाहून तुम्हालाही क्षणभर धक्का बसला असेल.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area