औरंगाबाद : मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र चोरी; आरोपीला अटक

 

औरंगाबाद : मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या ६२ वर्षीय महिलेची ६० हजार रुपये किंमतीची सोन्‍याची पोत लांबविणाऱ्या चोरट्याला ११ महिन्‍यानंतर सिडको पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली. वैभव गजानन इंगोले (२३, रा. कमळापुर फाटा, हनुमान नगर, रांजनगाव शेणपुंजी) असे त्याचे नाव आहे. त्याने सिडको भागात दोन महिलांचे मंगळसूत्र हिसकाविल्याची कबुली दिली असून दोन घरफोड्या केल्याची प्राथमिक कबुली दिली. गजानननगरमधील शांताबाई अजितकुमार गंगवाल (६२) यांची पोत, २४ ऑगस्‍ट २०२० रोजी पहाटे हिसकावली होती. पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांना आरोपीबाबत माहिती मिळाली. विशेष पथकाचे पोलिस उपनिरीक्षक कल्याण शेळके, बाळासाहेब आहेर, पोलिस अंमलदार शेवाळे, भिसे, सोनवणे, नरसिंग पवार यांनी वैभव याला ताब्यात घेतले.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area