Video | लोकांनी गजबजलेल्या रेस्टॉरंटमध्ये महिलेचा प्रताप, सर्वांसमोरच लागली केसांसोबत खेळायला, पाहा व्हिडीओ

 


आपल्या भोवताली असे काही लोक असतात जे स्वत:ची नेहमीच काळजी घेतात. आपण निटनेटके आणि टापटीप दिसावं म्हणून हे लोक हवं ते करतात. त्यासाठी वेगवेगळे सैंदर्य प्रसाधने तसेच इतर अनेक गोष्टी ते वापरतात. सध्या अशाच एका स्वत:ची काळजी घेणाऱ्या महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला रेस्टॉरंटमध्येच तिचे केस निटनेटके करत आहे. तिच्या या व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. (women style her hair in restaurant video went viral on social media)

केस खराब झाल्याचे महिलेले समजले

मिळालेल्या माहितीनुसार सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ हा अमेरिकेतील फ्लोरिडामधील नियामी येथील आहे. नियामी येथील प्रसिद्ध् असणाऱ्या डफी स्पोर्ट्स ग्रिल बारमध्ये हा प्रकार घडला. व्हिडीओमध्ये दिसत असलेली महिला या बारमध्ये नुकतीच आलेली होती. मात्र, यावेळी तिला तिचे केस खराब झाल्याचे समजले. त्यानंतर तिने आहे त्याच टिकाणी तिचे केस  निटनेटके करण्याचा निर्णय घेतला.

हेअर ड्रायरच्या मदतीने करतेय केस साफ

त्यानंतर या महिलेने उभे राहून हेअर ड्रायरच्या मदतीने केस व्यवस्थित करण्याचा निर्णय घेतला. रेस्टॉरंटच्या एका कोपऱ्यावर उभे राहून ही महिला हेअर ड्रायरच्या मदतीने तिचे केस ठीक करताना आपल्याला दिसत आहे. लोकांची गर्दी असलेल्या रेस्टॉरंटमध्ये ही महिला तिथेच उभे राहून आपले केस साफ करतेय. या व्हिडीओमध्ये महिला हेअर ड्रायरच्या मदतीने आरामात तिचे केस मोकळे करत आहे. स्वत:च्या घरात असल्यासारखे ती मोकळेपणाने वावरत आहे. मला कोणी बोलेल का ? रेस्टॉरंमध्ये लोक जेवत आहेत. माझे केस साफ करण्याचा या लोकांना काही त्रास होईल का ? अशा कशाचीही चिंता या महिलेला दिसत नाहीये.

click below to watch video

https://www.instagram.com/reel/CRLTv3qlhIp/?utm_source=ig_embed&ig_rid=ee8b2559-e368-4af2-9b77-b5352a5dc556

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area