कोकणातील तरुणाची कमाल; पडीक खार जमिनीवर उभारला कोळंबी शेतीचा भव्य प्रकल्प

 


सिंधुदुर्ग : डॉक्टर इंजिनिअर व्हायचं आणि मुंबई पुण्यात जाऊन नोकरी करायची अशी स्वप्न कोकणातील बहुतांशी तरुण पाहत असतात. मात्र या सर्वांहून वेगळं काहीतरी करण्याची इच्छा बाळगणारा मालवणमधील अपूर्व फर्नाडिस या तरुणाने आचऱ्यासारख्या ग्रामीण भागात कोळंबी प्रकल्प उभारला आहे. ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग झालेला हा तरुण फिशिंगच्या माध्यमातून अनेकांना रोजगार तर देतोच आहे. विशेष म्हणजे त्याने स्वत:चे जग निर्माण केलं आहे. (Young Automobile Engineer prawn farming project on fallow salt land in Konkan)

शासनाकडून केज फिशिंगसारखे प्रकल्पासाठी कर्जाची सुविधा

कोकण म्हणजे 700 किलोमीटरची विस्तीर्ण किनारपट्टी लाभलेला सुंदर भूभाग…कोकणात मोठ्या प्रमाणात मासेमारी होते. मात्र समुद्रातील मासेमारीला अलीकडे ग्रहण लागलं आहे. त्यामुळे शासन विविध योजनांद्वारे तरुणांना कर्ज देऊन केज फिशिंगसारखे प्रकल्प उभारु पाहत आहेत. मात्र एकूणच कोकणच्या परिस्थितीचा विचार करता कोकणात अजून ही संस्कृती म्हणावी तशी रुजलेली नाही.

तरुणाकडून पडीक खार जमिनीवर भव्य कोळंबी शेतीचा प्रकल्प 

मात्र इथल्याच एका तरुणाने पुढे येऊन 15 एकर पडीक खार जमिनीवर कोळंबी शेतीचा भव्य प्रकल्प उभारला आहे. एकूणच कोकणात सध्या मत्स्य दुष्काळासारख संकट उभं ठाकलं आहे. माशांची मागणी वाढली आहे. त्या तुलनेत मासे मिळण्याचे प्रमाण घटलं आहे. त्यामुळे नवे मत्स्य साठे निर्माण करण्यासाठी अपूर्वचा हा प्रयोग निश्चित उपयोगी ठरत आहे.


Konkan prawn farming project 1

खरंतर कोकणातील तरुण उद्योग व्यवसायात रस घेत नाहीत, अशी टीका होत असते. मात्र अपूर्वने स्वतः एका मोठ्या व्यवसायात उडी घेऊन ही सर्व टीका पुसून काढली आहे. शेकडो टन कोळंबी तो गोव्यासह महाराष्ट्रात पाठवतोय. खारपड जमीन म्हणजे विनावापर जमीन याच जमिनीतून तो सोनं पिकवतोय. कोळंबी शेतीतून यशस्वी उद्योगपती बनण्याची त्याची स्वप्न आहेत.

सध्या कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहे. अनेकांनी नातेवाईक गमावलेत. मात्र अशा विचित्र परिस्थितीत नवी वाट शोधण्याचा अपूर्व प्रयत्न करत आहे. त्यामुळे त्याच्या या प्रयत्नांना नक्कीच दाद द्यायला हवी.

(Young Automobile Engineer prawn farming project on fallow salt land in Konkan)


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area