अमिताभ बच्चन यांच्या झुंड चित्रपटात कामाची संधी, आता करतो मोबाईलची चोरी, नागपूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

 


नागपूर : अमिताभ बच्चन यांनी अभिनय केलेल्या झुंड चित्रपटात काम केलेला युवक मोबाईल चोर निघाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या युवकाने त्याच्या टोळीसोबत अनेक मोबाईल चोरल्याचे समोर आले आहे. प्रियांशू क्षेत्री असे या आरोपीचे नाव आहे. झुंड हा चित्रपट फुटबलॉशी संबंधित असल्यामुळे या चित्रपटात त्यालाही काम करण्याची संधी देण्यात आली होती. मात्र, सध्या हा एक मोबाईल चोर असून त्याने त्याच्या साथीदारांसोबत आतापर्यंत अनेक मोबाईल चोरल्याचे समोर आले आहे. मौज-मजा करण्यासाठी पैसे अपुरे पडत असल्याने आरोपींनी मोबाईल चोरीचा मार्ग अवलंब होता असा खुलासा झाला आहे. (young boy acted with Amitabh Bachhan has been arrested in crime of mobile theft)

मोबाईल चोरी करताना पोलिसांनी रंगेहात पकडले

मिळालेल्या माहितीनुसार नागपूर रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या रेल्वेमधील प्रवाशांचे मोबाईल हिसकावून पळणाऱ्या टोळीचा शोध गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होता. लोहमार्ग पोलीस या टोळीच्या मागावर होते. दरम्यान या शोधामध्ये एका प्रियांशू नामक आरोपीला मोबाईल चोरी करताना पोलिसांनी रंगेहात अटक केली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याच्या आणखी दोन साथीदारांचे नाव समोर आले. पोलिसांनी त्यांनाही ताब्यात घेतले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये प्रियांशू क्षेत्री, शुभम जांभुळकर आणि सतेंद्र यादव या तीन आरोपींचा समावेश आहे. लोहमार्ग पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीचे 14 मोबाईल जप्त केले आहेत.

आरोपीला झुंड चित्रपटात काम करण्याची संधी

अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी प्रियांशू क्षेत्री हा चांगला फुटबॉलपटू आहे. त्याची फुटबॉल खेळण्याची कला पाहून त्याला अभिनेता अमिताभ बच्चन यांनी अभिनय केलेल्या झुंड या चित्रपटात काम करण्याची संधी देण्यात आली होती. मात्र, नंतर मौज-मजा करण्यासाठी पैसे कमी पडत असल्यामुळे त्याने त्याच्या इतर दोन साथीदारांना घेऊन मोबाईल चोरी करण्याचा मार्ग अवलंबला.

एकूण 14 मोबाईल जप्त करण्यात आले

दरम्यान, या तिघांकडून आतापर्यंत 14 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार हे तिन्ही आरोपी मोबाईलची चोरी करत असत. तसेच चोरलेले मोबईल कमी पैशांमध्ये विकायचे. त्यानंतर मिळालेल्या पैशातून हे आरोपी मौजमजा करायचे. चोरांच्या या चोरीची चांगलीच चर्चा होत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area