चिकन उकळण्यासाठी गॅसवर ठेवलं पाणी, त्याच पाण्यात उकळून निघाली 2 वर्षांची चिमुकली

 कीव: आई-वडील आपल्या मुलांवर खूप जीव लावतात, त्यांना सर्व संकटांपासून वाचवतात. पण, कधीकधी पालकांच लक्ष जराही इकडं-तिकडं गेलं तर मोठा अपघात होऊ शकतो. अशीच एक घटना युक्रेनमध्ये घडली. दोन वर्षांची चिमुकली उकळत्या पाण्यात पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

द सनने दिलेल्या वृत्तानुसार, घटना यूक्रेनच्या ग्रिगोरिव्का गावातील आहे. पोलिसांच्या चौकशीत मुलीच्या आईनं सांगितले की, त्यांनी चिकन उकळण्यासाठी गॅसवर पाणी ठेवलं होतं. यानंतर काही कामासाठी आई किचनच्या बाहेर गेली आणि दहा मिनीटांनी परतली. किचनमध्ये परतल्यावर तिला मोठा धक्का बसला. चिकन उकळण्यासाठी जे पाणी ठेवलं होतं, त्याच पाण्यात दोन वर्षांची चिमुकली उकळताना दिसली. या घटनेत दोन वर्षांची चिमुकली अतिशय वाईट पद्धतीनं भाजली.


पालकांविरोधात गुन्हा दाखल

चौकशीत पुढे धक्कादायक माहिती समोर आली. पोलिसांनी सांगितल्यानुसार, या अपघातात भाजल्यानंतर पालकांनी चिमुकलीला हॉस्पिटलला घेऊन न जाता एका भोंदू डॉक्टराकडे नेलं. पण, परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर हॉस्पिटलला घेऊन गेले. लेस्या नावाच्या या चिमुकलीवर 10 दिवस उपचार झाले, पण डॉक्टर तिला वाचवू शकले नाही. आता कोर्टाने लेस्याची आई डरिना आणि वडील इवानला याप्रकरणी दोषी ठरवले असून, त्या दोघांना 7-15 वर्षांची शिक्षा होऊ शकते.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area