Bigg Boss OTT: घरात धमाका! एकीकडे भांडणाचा, दुसरीकडे कुकरचा ‘ब्लास्ट’, फोटो व्हायरल

 बिग बॉस ओटीटी (Bigg Boss OTT) हा शो सुरू होऊन जेमतेम काही दिवस होत नाही तोच घरात वाद सुरू झाले आहेत. पहिल्याच दिवशी वादाची ठिगणी पडली आणि आता तर प्रकरण हाणामारीपर्यंत जाते की काय, असे वाटू लागले आहे. ‘वूट सिलेक्ट’वर बिग बॉस हा शो तुम्ही अगदी 24 तास लाईव्ह बघू शकता. याचदरम्यान बिग बॉसच्या घरात एक जोरदार धमाका झाला. हा धमाका होता कुकरचा. होय, या धमाक्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

इन्स्टाग्रामवर बिग बॉस ओटीटीच्या घरातील एक फोटो मजेशीर कॅप्शनसह शेअर केला गेला आहे. या फोटोत कुकर गॅसवर ठेवलेला दिसतोय. पण त्याच्याकडे लक्ष नाही. अशात थोड्याच वेळात त्याचा ब्लास्ट होतो.  (bigg boss ott contestant blasts bigg boss cooker photo viral)
‘बिग बॉस का कुकर ब्लास्ट करत दिया इन्होने अब बिग बॉस की बारी....,’ अशा मजेशीर कॅप्शनसह या कुकरच्या ब्लास्टचा फोटो शेअर करण्यात आलाये. साहजिकच चाहत्यांनी यावर मजेशीर कमेंट्सही दिल्या आहेत. ब्लास्ट होणे ही बिग बॉसच्या घराची परंपराच आहे, असे एका युजरने लिहिले आहे. ये क्षण स्वर्ण अक्षरों में लिखा जायेगा, अशी कमेंट अन्य एका युजरने केली आहे.शमितावर भडकली अक्षरा सिंह

बिग बॉसच्या घरात अलीकडे भोजपुरी अ‍ॅक्ट्रेस अक्षरा सिंह शमिता शेट्टी यांच्यात चांगलीच जुंपली. शमिता व दिव्या अग्रवाल यांना किचनची जबाबदारी देण्यात आली आहे. यादरम्यान शमिताने सर्व स्पर्धकांना ग्लूटन फ्री प्रॉडक्ट्सपासून दूर राहण्यास सांगितले. हे प्रॉडक्स खास माझ्यासाठी व नेहा भसीनसाठी पाठवले असल्याचे ती म्हणाली. तिच्या या वाक्यावर अक्षरा भडकली. मग काय, यावरून अक्षरा व शमिता यांच्यात जुंपली. चार लाईन इंग्लिश की बोल दी तो अपने आप को हाईफाई समझने लगी, असे अक्षराने शमिताना सुनावले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area