पूरग्रस्त पुनर्निर्माणासाठी डॉ .एस.के. माने व संतोष आठवले यांचे शिरोळ तहसिलदार कार्यालयासमोर एक दिवशीय लाक्षणिक उपोषण संपन्न

 शिरोळ प्रतिनिधी : शिरोळ तालुका पूरग्रस्त पुनर्निर्माण समितीच्या वतीने मुख्य निमंत्रक डॉक्टर एस के माने व सहनिमंत्रक संतोष आठवले यांच्या नेतृत्वाखाली शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या विविध मागण्यासाठी शिरोळ तहसीलदार कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले

महापूरग्रस्तांचे रहिवास आहे त्या ठिकाणी अत्याधुनिक पद्धतीचा स्टील फेब्रिकेशन च्या साहित्याने दोन मजली घरे दुकाने रस्ते व उड्डाणपुलाची निर्मिती करून तालुका पूरग्रस्तांचे पुनर्निर्माण करावे या प्रमुख मागणीसाठी  शुक्रवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी तहसीलदार कार्यालय शिरोळ येथे लाक्षणिक उपोषण आंदोलन करण्यात आले

पूरग्रस्त शेतकऱ्यांना एकरी 60 हजार रुपये नुसकान भरपाई देऊन पीक कर्ज माफ करावे .पूरग्रस्त शेतमजूर व असंघटित क्षेत्रातील सर्व कामगारांना 15000 सानुग्रह अनुदान देण्यात येऊन त्यांना रेशन कार्डावर 30 किलो गहू व 30 किलो तांदूळ यांचे मोफत वाटप तात्काळ करावे .महापुरात पडलेल्या घरांना नुसकान भरपाई म्हणून त्यांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपये तात्काळ देण्यात यावेत. शेती पिकाचे महापुरामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी तालुक्यात पर्यायी बीटरूट ची लागण व मत्स्य शेती या करिता महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना विशेष सवलती देऊन प्रोत्साहीत करण्यात यावे. सन 2019 च्या महापुराची पुरेशा गृहीत धरून नुसकान भरपाई व सानुग्रह अनुदान देण्यात यावे तसेच पूरग्रस्त विद्यार्थ्यांचे शैक्षणिक फी माफ करण्यात यावी या मागणीसाठी हे उपोषण करण्यात आले 

यावेळी अॅड ममतेश आवळे ,असलम मुल्ला,आंदोलन अकूंशचे धनाजी चूडमूंगे, रामभाऊ डांगे , भिम आर्मी आजाद समाज पार्टीचे जिल्हा संघटक समिर विजापूरे , .सतिश चिंतनफल्ली ,डॉ .महेबूब  बागवान , पांडूरंग गायकवाड, सुनिल कुरुंदवाडे ,धनाजी पाटील सौ .आशा कांबळे , सौ . कांचन कानगे . सुनिल एकाटे ,संदिप काणंगे, संजय चौगुले (चिंचवाड ) बाजीराव दूधाळे ( अर्जुनवाड ) नंदकूमार ईनामदार ( दत्तवाड ) अरुण कांबळे (इचलकरंजी ) अमोल मोहिते ( शिरोळ ) बाळू केंगार (शिरोळ्)राजू वाडेकर (कुरुंदवाड ) अमित मांणगांवे ( हसूर ) भिमराव कोरे ( मिरज ) गौतम कांबळे ( दानवाड ) चंद्रकांत (राजू ) भिमराव कांबळे आदिनी आंदोलनात सहभागी झाले होते

सांयकाळी पाच वाजता नायबतहसिलदार  पी.जी.पाटील . अजित कुरणे संजय काटकर या आधिकाऱ्यांनी डॉ .एस के माने व संतोष आठवले यांची भेट घेऊन पूरग्रस्तांच्या मागण्याबाबत चर्चा केली आंदोलनातील पुरग्रस्तांच्या मागण्या या शासन स्तरावरील धोरणात्मक निर्णयाच्या असल्याने आम्ही आंदोलनकर्ताचे म्हणणे वरिष्ठ आघिकाऱ्यांना कळवले आहे असे सांगीतले

त्यानंतर संतोष आठवले यांनी हे एक दिवशीय  लाक्षणिक उपोषण समाप्त केल्याची घोषणा केली .सर्वाचे आभार शिरोळ तालूका पूरग्रस्त पूनर्निर्माण समितीचे कायदेविषयक सल्लागार अॅड .ममतेश आवळे यांनी मानले

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area