'मला जो नडला त्याला उभ्याने तोडला' ओरडत कोयता हवेत फिरवून दहशत माजवल्याप्रकरणी तरुणाला अटक

 


पिंपरी : लोखंडी कोयता हवेत फिरून दहशत निर्माण केल्याप्रकरणी तरुणाला अटक करण्यात आली. चिंचवड पोलिसांनी मंगळवारी (दि. १०) सायंकाळी ही कारवाई केली. योगेश अनंता गायकवाड (वय २५, रा. नागसेननगर झोपडपट्टी, बिजलीनगर, चिंचवड), असे अटक केलेल्या आरोपी तरुणाचे नाव आहे. पोलीस कर्मचारी निवास धनंजय विधाटे यांनी या प्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगशने त्याच्याजवळ विनापरवाना लोखंडी कोयता बाळगला. आला रे आला सगळ्यांचा बाप योगेश आला, मला जो नडला त्याला उभ्याने तोडला, असे मोठ्याने ओरडत आरोपीने कोयता हवेत फिरवला. लोकांना धमकी देत हनुमान स्वीटच्या दिशेने तो जात होता. त्यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली. पोलिसांनी कारवाई करून त्याला पकडले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area