हजारावर डॉक्टरांचे वतन थकल


कोल्हापूर: कोरोनाकाळात नियमित व गंभीर रुग्णांवर प्रभावी उपचार सेवा देत हजारो रुग्णांना जीवदान देणाऱ्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या राज्यभरातील एक हजारावर डॉक्टरांचे वेतन चार महिने थकले आहे. यात सीपीआर रुग्णालयाच्या ८० डॉक्टरांचा समावेश आहे. बहुतांश सहाय्यक प्राध्यापक डॉक्टरांची बदली कंत्राटी पदावर नुकतीच करण्यात आली आहे, तर काही वैद्यकीय अधिकारी आहेत. त्यामुळे खाते बदल झाला, असा तांत्रिक मुद्दा उपस्थित करून एमबीबीएस, एमएस, एमडी दर्जाच्या डॉक्टरांचे वेतन वैद्यकीय शिक्षण विभागाच्या मुंबईतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी थकीत ठेवले आहे.

दीड वर्षापूर्वी राज्यात कोरोनाचे संकट आले. बहुतांश जिल्ह्यातील ७० टक्के मध्यमवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाला खासगी रुग्णालयात उपचार घेणे मुश्कील होते. अशा स्थितीत राज्य शासनाने बहुतेक जिल्हा रुग्णालये कोरोना रुग्णालये म्हणून जाहीर केली. यात त्यानुसार वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत चालविण्यात येणाऱ्या शासकीय रुग्णालयात वैद्यकीय शिक्षण विभागाचे डॉक्टर चार शिफ्टमध्ये उपचार सेवेत होते.

यात विविध शाखांचे एमडी, एमएस झालेल्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सेवा चालवली जात आहे. यातून कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण जवळपास ९५ टक्क्यांच्या पुढे आहे. त्यामुळे सर्वच घटकांसाठी शासकीय रुग्णालयातील कोरोना उपचार सेवा वरदान ठरली.

दहा दिवसांपूर्वी याच डॉक्टरांनी काम बंद आंदोलनाचा इशारा दिला होता, तेव्हा वैद्यकीय जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून वेतनाबाबत चर्चा केली होती. तेव्हा दोन दिवसांत वेतन देण्याचे आश्वासन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानुसार डॉक्टरांनी आंदोलन स्थगित केले. त्याला आठ दिवस उलटले तरी अद्याप वेतन दिलेले नाही. यातून डॉक्टरांची फसवणूक झाली आहे. तीन महिन्यांत तांत्रिक अडचण दूर करता कशी आली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area