महिला सरपंच यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ला करांवर कठोर कारवाही करून महिलेला न्याय मिळवून द्या अन्यथा राज्य भर आंदोलन करू- नाभिक समाज

 

मलकापूर- दिपक इटणारे

महाराष्ट्र राज्यात नाभिक समाज हा अल्पसंख्याक असून आपल्या व्यवसायातून आपल्या कुटूंबाचे उदरनिर्वाह करीत गावात शांततामय सलोखा संबध नेहमीच कायम ठेवत आलेला असून , अशाच या अल्पसंख्याक समाजाला लोकशाही मार्गाने फार मोजक्या एद्याद्या व्यक्तीस आरक्षणाचा लाभ होवून सरंपच पदी आरुढ होत असते , परंतु अशातच या गरीब समाजाच्या महिला भगिनी सरंपचावर हल्ला होणे हि अशोभनिय बाब असून निंदणीय आहे , त्यामुळे आम्ही सरपंच  शारदा संतोष तांदुळकर यांचे वर गावागुंडानी केलेल्या या भ्याड हल्याचा जाहिर निषेध व्यक्त  करीत  . मौजे निपाणा येथील सरपंच सौ . शारदा संतोष तांदुळकर व त्यांचे ग्रा.प. सहकारी तसेच गावातील महिला भगीनी हया  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आत्म निर्भर कार्यक्रम हा टि.व्ही . वर पाहत असतांना या ठिकाणी गावातील गावंगुंड यांनी सरंपच सौ . शारदा तांदुळकर यांचे वर प्राणघातक हल्ला केला , या हल्यात सदर सरंच यांना जबर मारहण करण्यात येवून गावातील इतर सामान्य नागरिकांचया मध्यस्थीमूळे त्याचा जीव वाचला आहे . त्या गंभीर अवस्थेत असतांना त्यांना शासकीय सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले असून त्यांचेवर उपचार सुरु आहेत .

तसेच नाभिक समाजाच्या रक्तातील शारदा तांदुळकर यांनी आपली सरपंच पदाची धुरा सांभाळत एक अल्पसंख्याक समाजाच्या असून सुध्दा गावातील विकास कामाचा धडाकार प्रामाणिक पणा व सर्व चांगल्यागुणामूळे थोडयाच दिवसात गावामध्ये चांगले बदल घडू लागले असल्यामुळे गावातील जनसामान्याच्या आवडत्या सरंपच बनल्या आहेत . त्यातच गावात असलेल्या गावगुडाना त्याची हि बाब पचनी न पडल्यामूळे त्यांनी सदर सरंपच यांच्यावर प्राण घातक हल्ला करुन लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रकार केला आहे . त्यामुळे या गावगुंडाचा त्वरीत बंदोबस्त करण्यात येवून या गावगुंडानी केलेल्या हल्यातील गुन्हेगारांचा त्वरीत शोध घेवून तसेच या गुन्हेगारांना गावातील खतपाणी घालणाऱ्या संबधीत व्यक्तीवर तसेच हल्लेखोरांवर त्वरीत कडक कायदेशिर कारवाई करण्यात यावी . तसेच सौ . शारदा संतोष तांदुळकर यांचे कुटूंबियाला शासनींचे वतीने पोलिस सरंक्षण उपलब्ध करुन द्यावे हि विनंती . अन्यथा आम्हाला न्याय मिळण्या करीता महाराष्ट्र राज्यात आंदोलन उभे करू अशी मागणी नाभिक समाजाच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना देण्यात आले आहे यावेळी ज्ञानदेव तायडे अनंता तायडे दिपक तायडे उखर्डा तांदूळकर सुधाकर तायडे गणेश अमृतकर रवींद्र गंनगे दिनेश जाधव किशोर चित्ते विशाल फुकटे भागवत पर्वते संतोष लोंढे नितीन बेलोकार अमोल माळी रामचंद्र तायडे ज्ञानदेव पर्वते अमोल भोंडेकार यांच्या स्वाक्षरी आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area