बनावट गोळीबार प्रकरण रचणाऱ्या वन अधिकाऱ्यावर कारवाई करा अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर मेंढ्यांचा मोर्चा काढू जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

 

प्रतिनिधी बुलढाणा मोताळा तालुक्यातील पिंपळगाव नाथ येथे मेंढपाळांवर गोळीबार प्रकरण रचुन खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपेश लोखंडे यांच्या सदर बनावट गोळीबार प्रकरणाची खातेनिहाय चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल त्यांना निलंबित करावे या मागणीसाठी नंदू भाऊ लवंगे प्रदेशाध्यक्ष नवयुवक मल्हार सेना व धनश्री ताई काटीकर पाटील जिल्हा अध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्ष यांच्या नेतृत्वात िल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की बुलढाणा जिल्ह्यातील मेंढपाळ बांधव वंशपरंपरागत शेळी मेंढी पालन करतात सध्या कोरोना महामारी मुळे मेंढपाळ नैसर्गिक संकटात सापडले आहेत  त्यात वन विभागाचे अधिकारी भर टाकत मेंढपाळांवर खोटे गुन्हे दाखल करून मेंढी पालन मध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे पिंपळगाव नाथ वनपरिक्षेत्र अधिकारी दीपेश लोखंडे यांनी मेंढपाळ मध्ये दहशत पसरवण्याचा उद्देशाने बनावट गोळीबार प्रकरण रचून 35 ते 40 मेंढपाळांनी  त्यांच्यावर हल्ला केल्याची बतावणी केली आहे हे संपूर्ण प्रकरण वन अधिकारी लोखंडे यांनी स्वतःच्या प्रसिद्धीसाठी रचले असून 40 ते 50 मेंढपाळाचे फोटो किंवा व्हिडिओ स्वरूपातील कोणतेही पुरावे नसताना स्वतःला सिंघम स्टाईलने फेमस करण्याच्या उद्देशाने सदर बनावट प्रकरण तयार केले आहे. 

 प्रसिद्धीचे  खूळ डोक्यात गेल्यास पुढे चालून सदर अधिकारी भविष्यात बनावट इन काउंटर करून लोकांच्या जीवाशी खेळण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी या प्रकरणात वनपरिक्षेत्र अधिकारी दीपेश लोखंडे यांची व त्यांच्या सोबत या प्रकरणात असलेल्या संपूर्ण टीमची खातेनिहाय चौकशी करून दीपेश लोखंडे यांना त्वरित निलंबित करण्यात यावे व त्यांच्यावर मेंढी पालन मध्ये दहशत पसरवणे बनावट  गोळीबार प्रकरण रचणे व पदाचा गैरवापर करून गोळीबार करणे इत्यादी गुन्हे दाखल करण्यात यावे तसेच मेंढपाळांना सराई साठी जागा व पासेस उपलब्ध करून देण्यात याव्यात मेंढपाळांवर दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे रद्द करण्यात यावे अशी मागणी मल्हार नवयुवक सेना व राष्ट्रीय समाज पक्षातर्फे करण्यात आली या मागण्या पूर्ण न झाल्यास दिनांक 23 ऑगस्ट रोजी शेळ्या-मेंढ्या सह जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र धडक मोर्चा मोर्चा काढण्याचा इशारा मल्हार नवयुग सेनेचे प्रदेशाध्यक्ष नंदू भाऊ लवंगे राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष धनश्री ताई काटीकर पाटील यांनी दिला सदर निवेदनावर  विनोद सपकाळ, शांताराम मिसाळ, प्रा प्रकाश थाटे , रोशन वाकोडे इलियास खान इत्यादी कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area