प्रियकराचा नाद सोडत नसल्याने बापानेच मुलीला दानवाड पुलावरून नदीत दिले ढकलून

 

कुरुंदवाड: मुलगी प्रियकराचा नाद सोडत नसल्याने रागाच्या भरात बापाने मुलीला पुलावरून नदीत ढकलून दिल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी वापावर खुनाचा गुन्हा दाखल केला. दशरथ काटकर (वय ४२, रा. दत्तवाड, ता. शिरोळ) असे संशयित आरोपीचे नाव असून, त्याला अटक केली. वागण्यात बदल होत नसल्यानेच मुलीला नदीत ढकलून दिल्याची कबुली काटकर याने कुरुंदवाड पोलिसांना दिली. या प्रकरणी आणखी तिघांना ताब्यात घेतले आहे.

संशयित दशरथ यंत्रमाग कामगार आहे. त्याची मुलगी साक्षी (वय १७) हिचे गावातील तरुणाशी प्रेम प्रकरण होते. हे प्रकरण मान्य नसल्याने घरच्यांनी तिचे सांगलीतील तरुणाशी लग्न लावून दिले होते. तरीही साक्षी प्रियकराच्या संपर्कात होती. त्यामुळे काही दिवसापूर्वी नवऱ्याने तिला सोडपत्र दिले. साक्षीच्या या प्रकरणामुळे घरात भांडणे होत. त्या त्रासातून काही दिवसांपूर्वी साक्षी सांगलीला मावशीकडे गेली. साक्षीच्या या वर्तनामुळे मानसिक संतुलन बिघडलेल्या दशरथने शुक्रवारी (ता. (१४) सांगलीत जाऊन तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती प्रियकराला सोडण्यास तयार नव्हती. दरम्यान दोघेही दुचाकीवरून दत्तवाडकडे निघाले. कृष्णा नदीच्या पुलावर येताच संशयित दशरथने प्रियकराला सोड नाही, तर नदीत ढकलून देण्याची भीती घातली. तरीही साक्षी तयार नसल्याने रागाच्या भरात तिला नदीत ढकलून देऊन तो पुन्हा, सांगलीला गेला. दरम्यान, संशयित दशरथने शनिवारी (ता. १४) कुरुंदवाड पोलिसांत मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. रविवारी (ता. १५) पोलिसांनी संशयित दशरथला चौकशीदरम्यान खाक्या दाखविताच त्याने मुलीला नदीत ढकलून दिल्याची कबुली दिली. पोलिसानी वजीर रेस्क्यू फोर्सच्य सहाय्याने नदीपात्रात शोध घेतला असता का (ता. १६) कल्लोळ (ता. चिकोडी) येथील पात्रा साक्षीचा मृतदेह आढळला. पोलिस निरीक्षक चंद्रकांत निरावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अमित पाटील तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area