१० रुपयांचं दुधं सांडलं म्हणून पेटला वाद; नशेत दुचाकीस्वाराने लोखंडी रॉडने प्रहार करत घेतला जीव

 

पानीपतमध्ये क्षुल्लक कारणावरून जीवघेणी घटना घडली आहे. या प्रकरणात  नशेत असलेल्या दुचाकीच्या धडकेत १० रुपयांचं दूध सांडलं. यानंतर वाद पेटला. या पेटलेल्या वादात शेजारच्याने लोखंडी रॉडने तरुणाची हत्या केली. ही घटना बत्रा कॉलनीत घडली आहे. मृत व्यक्तीच्या पत्नीने आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ओल्ड इंस्ट्रियल पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

उत्तर प्रदेशातील शाहजानपुर निवासी अनुराग यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, त्यांचे कुटुंबीय गेल्या २२ वर्षांपासून पानीपतच्या बत्रा कॉलनीत भाड्याच्या घरात राहत आहेत. त्यांचे वडील ४२ वर्षीय महिपाल भंगारच्या सामानाचे काम करतात. रक्षाबंधन निमित्ताने रविवारी मुलगा घरी आला होता. रविवारी रात्री ८ वाजता मुलगा दुकानात सामान घेण्यासाठी आले होते. त्या वेळी त्याच्या मागून दुचाकीने येणारा व शेजारी राहणाऱ्या अमरजीत यांची दुचाकी समोरासमोर आल्याने दूध सांडलं. अमरजीत याने दारू प्यायलाचा आरोप करण्यात आला. दुचाकीची धडक लागल्यामुळे अमरजीतच्या हातातून दुधाची १० रुपयांची पिशवी खाली पडली. यावरुन अमरजीत त्याचे पूरणसोबत वाद करून लागले आणि त्यांच्या कानशिलात लगावली.


यावेळी आई शारदाने वाद पाहून त्या देखील घटनास्थळी पोहोचल्या. आरोपीने त्यांनाही मारहाण केली आणि सोन्याची चेन आणि कानातले काढून घेतले. गोंधळ ऐकून वडील महिपाल घटनास्थळी पोहोचले आणि मध्यस्थी केली. तेव्हा आरोपी लोखंडाचा रॉड घेऊन आला आणि त्याने महिलापच्या डोक्यावर प्रहार केला. वडिलांना वाचण्याचा प्रयत्न केला तर लोखंडाची रॉड पुरणच्या छातीला लागला. आरोपीने रॉडने 3 ते 4 वेळा प्रहार केले. त्यानंतर वडील बेशुद्ध अवस्थेत जमिनीवर कोसळले. त्यानंतर आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला. त्याने आपल्या वडिलांना तातडीने वडिलांना रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, आरोपी अमरजीतही तेथे उपचारासाठी आला होता. यावेळी पोलिसांनी त्याला अटक केली, अशी माहिती न्यूज १८ लोकमतने दिली आहे. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area