पुण्यातील खळबळजनक घटना! पोलीस आयुक्तालयात एकाने पेटवून घेत केला आत्महत्येचा प्रयत्न

 पुणे : पोलीस आयुक्तालयाच्या दारात एकाने पेटवून घेऊन आयुक्तालयाकडे धाव घेतल्याने आज सकाळी एकच खळबळ उडाली. हा प्रकार पोलीस आयुक्तालयाच्या गेटजवळ आज सकाळी साडेअकरा वाजता घडला. गेटवरील कर्मचारी आणि गुन्हे शाखेतील पोलिसांनी या व्यक्तीला वाटेतच अडवून तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले आहे. पोलीस आयुक्तालयाच्या दारात कडक बंदोबस्त असतो. दारातील रिस्पेशनला तुम्ही तुमचे नाव, येण्याचे कारण व कोणाला भेटायला येणार हे सांगितल्यानंतरच त्याची नोंद केली जाते. व त्यानंतर गेटवरील बॅरिकेट आतून उघडल्यावर अभ्यागताला आत जाता येते.

आज सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास एक जण गेटजवळ आला. त्याने स्वत:ला पेटवून घेऊन आतमध्ये धावत जाण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पाहून गेटवर एकच गोंधळ उडाला. जवळच उभ्या असलेल्या सुरक्षा रक्षक पोलीस व इतरांनी त्या व्यक्तीला अडवून आग विझविली. त्याला तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकारात ही व्यक्ती गंभीररित्या भाजली आहे. मात्र, त्याच्याविषयी अधिक माहिती मिळाली नाही. बंडगार्डन पोलीस अधिक माहिती घेत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area