मुंबई : सीआयएसएफच्या महिला शिपाई यास्मिन हैदर अली (२७) यांनी हॉस्टेलमध्येच गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी घडली. याप्रकरणी अँँन्टोपहील पोलीस अधिक तपास करत आहेत.
पोलिसांकड़ून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी १० ते दुपारी २ च्या दरम्यान सीआयएसएफ बॅचलर हाॅस्टेल सेक्टर क्रमांक ७ मध्ये यास्मीन यांनी पंख्याला गळफास घेत आयुष्य संपविले. घटनेची वर्दी लागताच सहाय्यक पोलीस आयुक्त सायन विभाग अश्विनी पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत राजे यांनी घटनास्थळी धाव घेतली. यास्मीन यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सायन रुग्णालयात नेण्यात आला आहे.
यास्मीन या उत्तरप्रदेशच्या रहिवासी होत्या. या घटनेने खळबळ उडाली आहे. त्यांच्या आत्महत्येमागचे नेमके कारण समोर आले नसून याबाबत अँटॉपहिल पोलीस अधिक तपास करत आहेत.