हृदयद्रावक घटना! कर्त्या पुरूषाच्या निधानानंतर नैराश्यात गेलेल्या पत्नी आणि मुलीची गळफास घेत आत्महत्या

 पश्चिम बंगालच्या नदिया जिल्ह्यात हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. घरातील कर्त्या पुरुषाच्या निधनानंतर नैराश्यात गेलेल्या पत्नी आणि मुलीने देखील घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदय हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आई आणि मुलीच्या आत्महत्येमागे आणखी दुसरे काही कारण होतं का? या अँगलने देखील पोलीस तपास करत आहेत.

काही दिवसांपूर्वी ६२ वर्षीय बाबूल दास यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर जेएनएम रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, उपचारादरम्यान रविवारी (१५ ऑगस्ट) सकाळी त्यांचा मृत्यू झाला. बाबलू दास यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी बाबूल यांची पत्नी आणि २२  वर्षीय मुलगी देखील होती. तसेच परिसरातील त्यांचे इतर नातेवाईक देखील उपस्थित होते.


बाबूल यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केल्यानंतर घरी आलेल्या पत्नी आणि मुलीला दुःख अनावर झाला. दोघींवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. घरातल्या कर्त्या पुरुषाशिवाय आयुष्य जगणं अवघड आहे, असा विचार करुन माय-लेकीने टोकाचा निर्णय घेऊन घरातच गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरु आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area