भाजीत कोथिंबीर घातली नाही म्हणून पतीने केली मारहाण; पत्नीने रागात प्राशन केले विष

 

इंदूरमधून एका क्षुल्लक कारणावरुन महिलेला मारहाण केल्याचं धक्कादायक वृत्त समोर आले आहे. भाजीत कोथिंबीर घातली नाही म्हणून पतीने पत्नीला मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या मारहाणीच्या घटनेनंतर पत्नीने रागाच्या भरात विष प्राशन केले. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी महिलेच्या वक्तव्यानंतर पतीविरोधात मारहाण आणि अत्याचाराची तक्रार नोंदवली आहे. आरोपी पती पत्नीला घरखर्चासाठी पैसे देत नव्हता. याशिवाय मुलांची शाळेची फीदेखील भरत नव्हता. सतत पत्नीला मारहाण करीत होता. पोलिसांनी तिच्या तक्रारीवरून पती राजूविरोधात हुंड्यासाठी त्रास देणे आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.

ही घटना शहरातील द्वारकापुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. लॉकडाऊनमध्ये राजू राजौरेचा कामधंदा सुटल्याने तो बेरोजगार झाला. त्यानंतर घरातील कौटुंबिक कलह वाढले आणि क्षुल्लक गोष्टींवरुन तो पत्नीला मारहाण करीत असे. पोलिसांनी सांगितलं की, रानू राजौरेने सांगितलं की, रविवारी रात्री जेवणावरुन तिचं पती राजूसोबत वाद झाला. पतीने जाब विचारला, भाजीत कोंथिबीर का नाही टाकली? यावर ती म्हणाली की, कोथिंबीर नव्हती. यानंतर राजू संतापला आणि त्याने पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत ती जबर जखमी झाली. काही वेळानंतर पत्नीने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. जवळपासच्या लोकांनी तिला रुग्णालयात दाखल केले. Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area