Shocking! निर्दयी पतीने उकळत्या पाण्याने घातली पत्नीला आंघोळ, कारण वाचून हैराण व्हाल

 उत्तर प्रदेशच्या शाहजहांपूरमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. इथे एका व्यक्तीने माणूसकीला काळिमा फासणारं कृत्य केलं आहे. त्याने कथितपणे आपल्या पत्नीवर उकळतं पाणी टाकलं. आरोपी आपल्या पत्नी नाराज होता कारण तिने मुलाला जन्म दिला नाही. या संतापजनक घटनेनंतर परिसरात दहशतीचं वातावरण आहे. घटनेनंतर लगेच पीडितेला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी सांगितलं की, उकळतं पाणी शरीरावर टाकल्याने महिला बरीच भाजली आहे. तिची स्थिती गंभीर आहे.  (हे पण वाचा : रस्त्यात झालं पती-पत्नीचं भांडण तर बाइक थांबवून दोघांनी पुलावरून घेतली उडी, एकाचा मृत्यू)

पीडितेला तीन मुली आहेत. तिच्या सर्वात लहान मुलीचा जन्म एक वर्षाआधी झाला होता. आरोपीचं नाव सत्यपाल आहे. पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.  शाहजहांपूरचे एसपी संजीव वाजपेयी म्हणाले की, २०१३ मध्ये पीडितेचं तिच्या पतीसोबत लग्न झालं होतं. आरोपी सत्यपाल आपल्या पत्नीवर माहेरहून ५० हजार रूपये आणण्यासाठी दबावही टाकत होता. त्यासाठी तो पत्नीला फार त्रास देत होता. इतकंच काय तर तिला जेवणही देत नव्हता.


ते पुढे म्हणाले की पीडितेच्या वडिलांनी जावयाविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. घटनेनंतर आरोपी फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. लवकरच त्याला पकडलं जाईल. त्यानंतर त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area