धक्कादायक! एकतर्फी प्रेमातून माथेफिरू तरुणाचा ब्लेड हल्ला; तरुणीच्या चेहऱ्यावर पडले ४५ टाके

 

इंदूर: मध्य प्रदेशातल्या इंदूरमध्ये एकतर्फी प्रेमातून एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणानं तरुणीवर ब्लेडनं हल्ला केला. तरुणीला वाचवण्यासाठी तिचा भाऊ सरसावला. त्याच्यावरही तरुणानं हल्ला चढवला. या हल्ल्यात तरुणी आणि तिचा भाऊ गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर एम वाय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तरुणीच्या दोन्ही गालांवर ४५ टाके पडले आहेत. पोलिसांनी माथेफिरू तरुणाला अटक केली आहे.

इंदूरच्या आझाद नगरमध्ये मंगळवारी रात्री हा प्रकार घडला. तीन वर्षांपूर्वी विवाह बंधनात अडकलेली तरुणी माहेरी आली होती. मंगळवारी माथेफिरु तरुणानं तरुणीला एका व्यक्तीसोबत पाहिलं. त्यानंतर संध्याकाळी माथेफिरु तरुण तिच्या घरात घुसला. त्यानं तिच्यावर ब्लेडनं हल्ला केला. तरुणानं तरुणीच्या चेहऱ्यावर ब्लेडनं सपासप वार केले. तरुणी वेदनांमुळे विव्हळत होती. मदतीसाठी आरडाओरड करत होती. तिला वाचवण्यासाठी तिचा भाऊ पुढे आला. तरुणानं त्याच्यावरही हल्ला केला. माथेफिरुच्या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यानंतर माथेफिरु तिथून पळून काढला. तरुणाची प्रकृती अतिशय गंभीर आहे.


पोलिसांनी आरोपीला त्याच्या नातेवाईकांच्या घरातून ताब्यात घेतलं. अनेक वर्षांनी तरुणीला पाहिल्यानं प्रचंड राग आला. त्यातून हे कृत्य केल्याचं त्यानं पोलिसांना सांगितलं. आरोपीचं तरुणीवर प्रेम होतं. त्याला तिच्याशी लग्न करायचं होतं. मात्र तरुणीनं दुसऱ्या मुलाशी लग्न केलं. त्यामुळे तरुण दुखावला गेला होता. तरुणीनं माथेफिरु तरुणाविरोधात एफआयएर नोंदवला आहे. सध्या पोलीस आरोपीची चौकशी करत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area